कणकवलीत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 12:44 IST2022-10-15T12:43:36+5:302022-10-15T12:44:00+5:30

देवगड येथील गुन्हया मधून तो सध्या जामीनावर सुटलेला होता

Suspect who tried to break bank ATM in Kankavli arrested | कणकवलीत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक

कणकवलीत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक

कणकवली: कणकवली शहरातील नवरे हॉस्पिटल जवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कणकवली शाखेचे बंद दरवाजाचे कुलूप व एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला पकडण्यात यश आले. पोलिसांनी त्याच्यावर चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

त्या संशयिताचे नाव आकाश मुकुंद कोयंडे (वय२३) असून तो देवगड येथील आहे. अटक करण्यात आलेल्या आकाश  कोयंडे याचा काही महिन्यापूर्वी देवगड येथे झालेल्या घरफोडीतही हात होता. देवगड येथील गुन्हया मधून तो सध्या जामीनावर सुटलेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Suspect who tried to break bank ATM in Kankavli arrested