शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

सुशांत नाईक यांनी विनाकारण जनतेत संभ्रम पसरवू नये ! : समीर नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:34 IST

Kankavli Sindhudrugnews- शिवसेना प्रवेशासाठी दरवाजे उघडे आहेत असे मला सांगणाऱ्या विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी त्यांचे दरवाजे वेळीच घट्ट बंद करावेत. मी कट्टर राणेसमर्थक असून भाजपचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे जनतेत विनाकारण संभ्रम पसरवून शिवसेनेत आपले वजन वाढविण्याचा नाईक यांनी प्रयत्न करू नये असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांना लगावला आहे.

ठळक मुद्देसुशांत नाईक यांनी विनाकारण जनतेत संभ्रम पसरवू नये ! : समीर नलावडेभाजप जिल्हाध्यक्षांबरोबर कोणतेही पक्षीय वाद नाहीत

कणकवली : ​शिवसेना प्रवेशासाठी दरवाजे उघडे आहेत असे मला सांगणाऱ्या विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी त्यांचे दरवाजे वेळीच घट्ट बंद करावेत. मी कट्टर राणेसमर्थक असून भाजपचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे जनतेत विनाकारण संभ्रम पसरवून शिवसेनेत आपले वजन वाढविण्याचा नाईक यांनी प्रयत्न करू नये असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांना लगावला आहे.कणकवली येथील नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत समीर नलावडे बोलत होते. ते म्हणाले की , कणकवली शहरात जनतेमध्ये व कणकवलीच्या राजकारणामध्ये माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करून आपले वजन वाढवण्याचा सुशांत नाईक यांचा प्रयत्न आहे.मी माझ्या भूमिकेशी कायम ठामच आहे. दबाव व दडपण हे शब्द माझ्या डिक्शनरी मध्ये नाहीत. नाईक यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजी मार्केट विषयावर न बोलता माझ्या भूमिकेबाबत ते बोलले. त्यामुळे त्यांनी त्यांची व्यावसायिक भूमिका तपासून पाहावी.सुशांत नाईक यांनी भाजी मार्केट नगरपंचायतने विकसित करावे. अशी भूमिका मांडली आहे. ती भूमिका त्यांनी आपल्या पालकमंत्र्यांमार्फत निधी आणून पूर्ण करावी. केवळ तोंडाच्या बाता मारून आरक्षणे विकसित होत नाहीत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे , आमदार नितेश राणे व भाजपा पक्षाचा मी कट्टर कार्यकर्ता आहे. तसेच माझ्या पक्षाशी मी ठाम आहे.त्यामुळे नाईक यांनी आपले दरवाजे घट्ट बंद करून ठेवावेत. अन्यथा त्यांच्याकडचे सगळे बाहेर येऊन त्यांचे घर रिकामे होईल. जानेवारी रोजीच्या नगरपंचायत बैठकीत भाजी मार्केट बाबत मी भूमिका मांडली. ती मुख्याधिकारी व प्रशासनाला समजली आहे. यामुळे भाजी मार्केट या विषयासंदर्भात पुन्हा मला भूमिका मांडण्याची आवश्यकता नसल्याचे नलावडे यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करणे हे काम मुख्याधिकाऱ्यांचे असते असेही ते म्हणाले.राजन तेली व माझ्यात पक्षीय वाद नाहीत . मला नगरपंचायतच्या हिताचे जे विषय वाटले ते मी मांडले. त्यामुळे नारायण राणे , नितेश राणे ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा मी कार्यकर्ता असेन. असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले. भालचंद्र महाराज संस्थान शेडच्या भूमीपूजनाच्यावेळी आम्ही भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या स्वागतासाठी नियोजन करत असल्यामुळे त्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जाता आले नाही. मात्र नगरपंचायतने या शेडसाठी ना हरकत दिली आहे.

या कामाचा प्लान पुन्हा रिव्हाईज झाला आहे. तो देखील कायद्यात बसवून परवानगी दिली आहे. त्यामुळे या संस्थांनला आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत. तसेच जर भाजी मार्केट विकासकाच्या विरोधात मुख्याधिकार्‍यांनी कायद्यानुसार कारवाई केली तर याप्रश्नी कुणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे मुख्य अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत असेही नलावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग