शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत खिल्लारे खून प्रकरण: पार्टीत बसले अन् खिल्लारेला संपवले; सांगली, सातारा जिल्ह्यांतून पाच जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 12:25 IST

आर्थिक देवघेवीतून सुशांत खिल्लारे याच्या खून

सावंतवाडी : आर्थिक देवघेवीतून आंबोली घाटात घडलेल्या सुशांत खिल्लारे याच्या खून प्रकरणात आणखी पाच जणांचा सहभाग असल्याचे संशयित तुषार पवार याच्या चौकशीत पुढे आले. त्यानंतर यातील पाचही जणांना सांगली व सातारा जिल्ह्यातून सावंतवाडी पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. पार्टीच्या वेळी आपल्याकडून झालेल्या मारहाणीत त्याचा खून झाला, अशी कबुली पवार याने पोलिसांसमोर दिली. मात्र, मृतदेह घाटात टाकताना हे पाच जण नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.या पाच जणांमध्ये आबासो ऊर्फ अभय बाबासो पाटील (३८ रा. वाळवा, सांगली), प्रवीण विजय बळीवंत (२४, रा. वाळवा, सांगली), राहुल कमलाकर माने (२३, रा. कराड, सातारा), स्वानंद भारत पाटील (३१, रा. इस्लामपूर, सांगली), राहुल बाळासाहेब पाटील (३१, रा. वाळवा, सांगली) यांचा समावेश आहे.या सर्वांना ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आंबोली घाटात खिल्लारे याच्या खून प्रकरणात आणखी काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर तपासाची सूत्रे पोलिस उपअधीक्षक यांनी फिरविण्यास सुरुवात केली.

यात अटकेत असलेला तुषार पवार याची कसून चौकशी केली. आम्ही आर्थिक देवघेवीतून कामगार पुरवणारा मुकादम असलेल्या खिल्लारे याचे अपहरण केले. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी आपण सर्व पार्टी करण्यासाठी बसलो. यावेळी त्याला सर्वांनी मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी आणखी पाच जण भाउसो माने व आपण मिळून आणखी सहा जण होते, असे त्याने सांगितले.सीसीटीव्ही फुटेजची तपासणीयाबाबत उपविभागीय अधिकारी सोळंके म्हणाल्या की, या प्रकरणात आम्ही संशयित पवार याची कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर काही गोपनीय व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील चौकशी करण्यात आली. यात काही सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सर्व चौकशीत या प्रकरणात आणखी पाच जणांचा थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस