शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेसाठी सहकारी संस्थांचे सर्वेक्षण

By admin | Updated: July 2, 2015 22:50 IST

सहकार नियम : अकार्यक्षम संस्थांची नोंदणी होणार रद्द

रत्नागिरी : सहकार क्षेत्राच्या गुणात्मक वाढीसाठी सहकार विभागाने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत राज्यभर सहकारी संस्थांची महत्त्वाकांक्षी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या सर्वेक्षणात अकार्यक्षम आढळणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.ही मोहीम जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. मोहिमेंतर्गत प्रशासन व लेखा परीक्षण विभागातील कर्मचारी संस्थेच्या नोंदणीकृत पत्त्यावर समक्ष भेट देऊन संस्थेची पडताळणी करणार आहेत. ३१ मार्च २०१५ अखेर रत्नागिरी जिल्ह्यात नोंदणीकृत संस्था २४४०, प्राथमिक कृषी पतसंस्था ३६७, नागरी व ग्रामीण बिगरशेती पतसंस्था ३१८, प्रक्रिया संस्था २६, गृहनिर्माण संस्था १०२० अशा एकूण ४ हजार १७१ सहकारी संस्था आहेत. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या १७ जून २०१५ च्या परिपत्रकान्वये सर्व सहकारी संस्थांची पाहणी करुन केवळ नावाला कागदोपत्री असलेल्या, बंद, कार्यस्थगित सहकारी संस्था अवसायनात घेऊन नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची पडताळणी सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी करणार आहेत. ज्या संस्थांनी कामकाज सुरु केलेले नाही, कामकाज करण्याचे बंद केले आहे, ज्यांचे भागभांडवल ५०० रूपयांपेक्षा कमी आहे अथवा सहकार कायद्यानुसार आवश्यक विवरणपत्र निबंधकांकडे सादर केलेली नाहीत, अशा संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.सहकारी संस्थांचे पदाधिकारी व पडताळणी करणारे कर्मचारी यांची भेट न झाल्यास, संस्थेसंबंधी व्यक्ती आढळून न आल्यास अगर नोंदणीकृत पत्त्यावर संस्था आढळून न आल्यास संस्थेची नोंदणी रद्द करणेबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याने संस्थांनी तालुका सहाय्य्क निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक राजेंद्र महाजन यांनी केले आहे. (प्रतिनिधी)