शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयीन प्रक्रिया सरस : सुरेंद्र तावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 15:01 IST

मुंबई उच्च न्यायालयात काम करताना माझ्या निरीक्षणात या जिल्ह्यात न्यायसंस्थेत शिस्त असल्याचे पहायला मिळते. याचे श्रेय वकिलांसोबतच येथील न्यायसंस्थेलाही दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांनी केले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयीन प्रक्रिया सरस : सुरेंद्र तावडे  कणकवली वकील संघटनेतर्फे सत्कार, शालेय आठवणींना दिला उजाळा

कणकवली : महाराष्ट्राच्या तुलनेत सिंधुदुर्गचेन्यायालयीन प्रक्रियेत चित्र वेगळे आहे. येथील जनता आपल्या न्याय हक्कांसाठी जागृत असली तरी न्यायव्यवस्थेवर बोजा टाकत नाही.  कोकणात दिवाणी व फौजदारी खटल्याचे प्रमाण कमी आहे. कारण, येथे त्रास देण्यासाठी बोगस खटले दाखल केले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला न्याय मिळाला पाहिले. यासाठी पक्षकार झटत असतो.

मुंबई उच्च न्यायालयात काम करताना माझ्या निरीक्षणात या जिल्ह्यात न्यायसंस्थेत शिस्त असल्याचे पहायला मिळते. याचे श्रेय वकिलांसोबतच येथील न्यायसंस्थेलाही दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांनी केले.कणकवली तालुका वकील संघटनेच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते . यावेळी सीमादेवी तावडे, जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. कदम, कणकवली तालुका बार असोसिएशनचे अ‍ॅड. विद्याधर चिंदरकर, बार कौन्सिल सदस्य अ‍ॅड. संग्राम देसाई, आमदार नीतेश राणे, माजी आमदार विजय सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तावडे म्हणाले, माझे वडील न्या. पंढरीनाथ तावडे यांच्यासोबत मी मुंबईहून गावी आल्यानंतर कणकवलीतील प्राथमिक शाळा नं. ४ मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी निमणकर गुरुजी यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. त्यांनी माझ्याकडून गणित, इतिहास विषय पाठ करून घेतानाच शिस्तीचेही धडे दिले. माझे आजोबा कडक शिस्तीचे असल्याने पूर्वानुभव होताच. त्यानंतर एस. एम. हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी आम्हांला शिक्षिका म्हणून लाभलेल्या बांदिवडेकर, अ‍ॅड. उमेश सावंत यांच्या आई अलका सावंत यांनी मला घडविले.ती दिशा माझ्या आयुष्यासाठी मार्गदर्शक होती. सुरेंद्र पंढरीनाथ तावडे ही माझी ओळख शाळा नंबर ४ मध्येच झाली. शाळेत नाटकात मी स्त्री पात्र साकारले होते. माझे मित्र मला त्या भूमिकेच्या नावाने हाक मारत असत. मुंबईत रुपारेल महाविद्यालयात असतानाही १० नाटकात काम केले. तेथून मी माझ्या क्षेत्रात बदल केला. मात्र, वकील व न्यायाधीश या भूमिकेत बदल करताना मला फारसे वेगळे वाटले नाही. वकिली व्यवसाय व न्यायदान करण्याच्या परिश्रमात फरक निश्चित आहे.कणकवलीवर माझे प्रेम आहे. कणकवलीत आल्यानंतर माझे मित्र सुनील नाडकर्णी, संजय पाध्ये, बाळा धुमाळे यांच्या दुकानात बसायचो. ते माझे वर्गमित्र आहेत. गेली ५० वर्षे आमची मैत्री आहे. माझ्या वडील, आजोबांनी ज्या ठिकाणी काम केले तेथे सत्कार स्वीकारणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे वाटले, असेही ते म्हणाले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. कदम, कणकवलीचे दिवाणी न्या. एस. ए. जमादार यांनीही मनोगत व्यक्त केले.अ‍ॅड. विद्याधर चिंदरकर यांनी वकील संघटनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा सत्कार करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार मानले. प्रास्ताविकात अ‍ॅड. उमेश सावंत यांनी न्या. तावडे यांचा परिचय करून देताना न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना आम्ही सत्कार करणार असल्याची विनंती केली. त्यांनी होकार दिल्याने हा कार्यक्रम आज होत आहे, असे सांगितले. आभार अ‍ॅड. मनोज रावराणे यांनी मानले.

 

टॅग्स :Courtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग