मालवण शहरातील महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या, अभ्यासाचे दडपण असल्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:09 IST2017-11-20T17:04:49+5:302017-11-20T17:09:31+5:30
मालवण शहरातील गवंडीवाडा येथील प्राची रामदास चव्हाण (१९) या महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या वाशाला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे रविवारी सकाळी ११.३० वाजता निदर्शनास आले. प्राची ही कुडाळ येथील संत राऊळ महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत होती.

मालवण शहरातील महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या, अभ्यासाचे दडपण असल्याचा अंदाज
मालवण : शहरातील गवंडीवाडा येथील प्राची रामदास चव्हाण (१९) या महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या वाशाला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे रविवारी सकाळी ११.३० वाजता निदर्शनास आले. प्राची ही कुडाळ येथील संत राऊळ महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत होती.
शहरातील गवंडीवाडा येथे प्राची चव्हाण ही आपल्या कुटुंबीयांसमवेत रहायची. परीक्षा कालावधी सुरु असल्याने ती घराच्या एका खोलीत अभ्यासासाठी ११ वाजता गेली. त्या खोलीचा तिने दरवाजाही लावून घेतला.
मात्र अभ्यासासाठी गेलेली प्राची बराचवेळ खोलीबाहेर आली नाही. म्हणून तिच्या आईने खोलीचा दरवाजा उघडला असता प्राची घराच्या वाशाला ओढणीने बांधलेल्या अवस्थेत लटकताना दिसून आली.
आईने हंबरडा फोडल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्राची हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. प्राची हिला अभ्यासाचे दडपण असल्याने तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला
जात होता. याप्रकरणी अधिक तपास विवेक नागरगोजे हे करीत आहेत.