प्रसिद्ध पोल्ट्री व्यावसायिकाची आत्महत्या, सावंतवाडीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 07:03 IST2021-03-11T07:03:28+5:302021-03-11T07:03:36+5:30
सावंतवाडीतील घटना : बागेतील विहिरीत आढळून आला मृतदेह

प्रसिद्ध पोल्ट्री व्यावसायिकाची आत्महत्या, सावंतवाडीत खळबळ
सावंतवाडी : सावंतवाडी चराठा येथील प्रसिद्ध पोल्ट्री व्यवसायिक मोजेस अँथोनी डिसील्वा (५३) रा. न्यू-खासकिलवाडा यांनी बुधवारी कारीवडे येथे आपल्या बागेतील विहिरीत आत्महत्या केली. त्यांनी कर्जबाजारीपणामुळे हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेमुळे सावंतवाडीत एकच खळबळ उडाली आहे.
मोजेस डिसील्वा हे सावंतवाडीतील प्रसिद्ध पोल्ट्री व्यावसायिक असून त्यांचा मृतदेह कारिवडे येथील विहिरीत आढळून आला. सावंतवाडी शहरात त्यांचे युनिक फूड नावाचे हॉटेल आहे. त्याच्या माध्यमातून ते चिकनचे पदार्थ विकत होते, तसेच माजगाव येथे माटव नावाने काही वर्षापूर्वी हॉटेलही होते. विशेष म्हणजे सिंधुदुर्गसह गोवा आजरा भागातही ते पोल्ट्री व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. भावना कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांचा सावंतवाडी शहरात बांधकाम व्यवसाय होता, ते सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.