शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

ऊसतोडणी पाळीपत्रकानुसारच केली जाईल : सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 1:56 PM

Sugar factory, sindhdudurgnews, साखर कारखान्याचे अधिकारी २५ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ऊस क्षेत्राची पाहणी करून तोडणी सुलभ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सुचना करतील. त्यानंतर पाळीपत्रक निश्चित करून ऊस तोडणी केली जाईल. वशिलेबाजीवर अजिबात तोडणी करू नये अशी सूचना कारखाना व्यवस्थापनाला केली असून जिल्ह्यातील एकाही ऊस उत्पादक शेतकऱ्यावर तोडणीच्या बाबतीत अन्याय होऊ देणार नाही, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देऊसतोडणी पाळीपत्रकानुसारच केली जाईल : सतीश सावंत २५ आॅक्टोबरपूर्वी कारखान्याकडून ऊस क्षेत्राची पाहणी

वैभववाडी : साखर कारखान्याचे अधिकारी २५ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ऊस क्षेत्राची पाहणी करून तोडणी सुलभ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सुचना करतील. त्यानंतर पाळीपत्रक निश्चित करून ऊस तोडणी केली जाईल. वशिलेबाजीवर अजिबात तोडणी करू नये अशी सूचना कारखाना व्यवस्थापनाला केली असून जिल्ह्यातील एकाही ऊस उत्पादक शेतकऱ्यावर तोडणीच्या बाबतीत अन्याय होऊ देणार नाही, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील कार्यालयात पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे अधिकारी आणि बँकेच्या संचालकांची ऊस तोडणी नियोजनाबाबत बैठक झाली. त्यानंतर सावंत यांनी ही माहिती दिली.यावेळी बँकेचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, अनिरुद्ध देसाई, कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील, एस. एस. पवार, ऊस विकास अधिकारी एस. एस. पाटील, बँकेचे शाखाधिकारी सर्जेराव यादव आदी उपस्थित होते.सावंत पुढे म्हणाले, गेल्या हंगामात जिल्ह्यातून ८३ हजार टन ऊस डी. वाय. पाटील कारखान्याला शेतकऱ्यांनी घातला. या ऊसाची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. यावर्षीही ऊसतोडणी नियोजनबध्द व्हावी; या हेतूने कारखान्याच्या अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक बैठक झाली.

ऊसतोडणी करताना अनेक अडचणी येतात. त्याअनुषंगानेही चर्चा झाली. काही शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये तण असते. त्यामुळे तोडणीमध्ये अडचणी येतात. त्यासाठी कारखान्याचे अधिकारी २५ आॅक्टोबरपर्यंत ऊसक्षेत्राची पाहणी करणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये तण असेल त्यांना तणनाशक फवारणीच्या सूचना केल्या जातील. त्यानंतर १२ महिने पूणृ झालेल्या ऊस तोडणीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.एफआरपीपेक्षा जादा दराची शक्यतायावर्षी ऊस तोडणी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे तोडणीला उशिरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणे यावर्षीही दर दिला जाईल. याशिवाय प्रतिटन अधिक १०० रुपये दर मिळण्याची शक्यता आहे, असे मत सतीश सावंत यांनी व्यक्त केले.शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनपाळीपत्रक तयार झाल्यानंतर ते कारखान्याच्या गट कार्यालयात लावण्यात येणार आहे. त्याचबरोबरच तोडणीविषयीची माहिती गावच्या सेवा सोसायट्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना काही सूचना किंवा हरकती नोंदवायच्या असतील तर त्याही नोंदवून घेतल्या जातील.

याशिवाय जिल्हा बँकेच्या तालुका कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना हरकती नोंदविता येणार आहेत. कोणत्याही परिस्थिती वशिलेबाजीने ऊसतोडणी करू नये, अशी सुचना कारखान्याच्या संचालकांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेतकºयांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेsindhudurgसिंधुदुर्ग