शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

आंबोली-कावळेसाद मोहीम यशस्वी, वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 7:06 PM

Amboli hill station Sindhudurg- वैभवसंपन्न निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून विशेष प्रसिद्ध असलेल्या आंबोलीतील कावळेसाद येथे साहसी रॅपलिंग करून तेथील जैववैविधता अभ्यास संशोधन मोहीम अखेर यशस्वीरित्या पूर्ण झाली.

ठळक मुद्देआंबोली-कावळेसाद मोहीम यशस्वी, वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेचा अभ्यास सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबतर्फे आयोजन

सिंधुदुर्ग : वैभवसंपन्न निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून विशेष प्रसिद्ध असलेल्या आंबोलीतील कावळेसाद येथे साहसी रॅपलिंग करून तेथील जैववैविधता अभ्यास संशोधन मोहीम अखेर यशस्वीरित्या पूर्ण झाली.कावळेसादच्या दऱ्या-खोऱ्यातून वाट काढत वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी ह्यसिंधु सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबह्णने आयोजित केलेल्या या मोहिमेची २७ डिसेंबर रोजी सांगता झाली. या मोहिमेत ६४ निसर्गप्रेमी तसेच संशोधकांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत इथल्या दऱ्याखोऱ्यांत कोणत्याही प्रकारचे संशोधन झालेले नाही. शिवाय आंबोलीतील कावळेसाद कड्यावरून अगदी अननुभवी निसर्गप्रेमींना रॅपलिंग करण्याची ही पहिलीच संधी उपलब्ध झाली असल्याने, ही मोहीम सर्व निसर्ग अभ्यासक व निसर्गप्रेमी यांच्यासाठी विशेष महत्त्वाची होती. या मोहिमेचे मुख्य आयोजक प्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली होती.रामेश्वर सावंत हे भारतातील एक नामवंत गिर्यारोहक असून त्यांनी आतापर्यंत भारतात अनेक ठिकाणी गिर्यारोहणाचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. खासकरून कोकणातील गड-किल्ल्यांवर त्यांनी अनेक वर्षे अशाप्रकारचे साहसी उपक्रम यशस्वी केले आहेत. यात विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील खेड्या-पाड्यातील तरुणांना या साहसी उपक्रमांसाठी खास प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यावर त्यांचा विशेष भर असतो. या अभिनव मोहिमेतही ११ युवती महिलांसह ६४ निसर्ग साहसप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.कावळेसाद येथील जवळपास ८०० फूट खोल दरीत निसर्ग अभ्यासक डॉ. योगेश कोळी, प्राणीशास्त्र विभाग आणि वनस्पती अभ्यासक डॉ. बाळकृष्ण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पक्षी, उभयचर, कीटक व वनस्पती यांच्या नोंदी करण्यात आल्या.स्थानिकांचे मोहिमेला सहकार्यकावळेसाद खोऱ्यातील या अभिनव साहसी मोहिमेच्या यशामागे स्थानिक लोकांनीही मोलाचे सहकार्य केले. चौकुळचे गोवा येथे कार्यरत बी. आर. गावडे, आंबोलीचे हेमंत परब, गेळे येथील मोहनकाका गवस, श्रीकृष्ण उर्फ गुरू गवस, शिरशिंगे गोठवेवाडीतील सुभाष उर्फ बाबू सुर्वे, जीवन लाड, मळईवाडी येथील ग्रामस्थ, माधव कारेकर टीम यांचे बहुमोल सहकार्य लाभले. ज्यामुळे या कावळसाद मोहिमेच्या यशाचा आनंद वाढला.१८५ वनस्पतींची नोंदप्राणी वैविध्यतेसोबत वनस्पती अभ्यासक डॉ. बाळकृष्ण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली १८५ वनस्पतींची नोंद कावळेसाद दरीतील सदाहरित जंगलातून करण्यात आली. यामध्ये १२ वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या लाल सूचीत (फी िछ्र२३ ङ्मा ळँ१ीं३ील्ली ि५ं२ू४ह्णं१ स्रह्णंल्ल३ २स्रीू्री२) समावेश असून त्यामध्ये चांदाकोचा, चांनपाटा (ॲन्टीयारीस टॉक्झीकारिया), भिमाची वेल (बहुमोन्शिया जरडोनियाना), काळीनो (डायोस्ठिपायरोस कंडोलियाना), ऊमळी (निटम ऊला), हारपुली (हारपुलीया अरबोरिया), रानबीब्बा (होलीगारना ग्रॅहमी), कडू कवठ (हिडनोकारपस पेन्टान्ड्रा), खाजकुवली (म्युकुना मोनोस्पर्मा), आंबेरी (नोथोपेजीया कॅस्टनीफोलिया), ओलॅक्स सीटोकोरम, हूम (पोलीयाल्थीया सेरासॉयडीस) व साजेरी (साजेरिया लाऊरिफोलीया) अशा एकूण १२ वनस्पतींचा समावेश आहे. याबरोबरच हारपुलीया अरबोरिया अर्थात हापुली व सायझिझियम लेटम जिला देवजांभूळ म्हणतात, या वनस्पती प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नोंदविल्या गेल्या आहेत. 

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग