कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध, कारिवडेवासीय आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:53 PM2020-10-13T12:53:10+5:302020-10-13T12:55:53+5:30

Garbage Disposal Issue, sindhdurug, kariwadegrampanchyat सावंतवाडी नगरपरिषदेने कारिवडे येथील सर्व्हे नंबर १२४ (ब), हिस्सा नंबर १, क्षेत्र ५ एकर या जागेत घनकचरा टाकणे व कुंपण भिंत घालण्याचे काम सुरू करणार असल्याचे कळवून एका पत्रामध्ये गांडूळ खत प्रकल्प तर दुसºया पत्रात बायोगॅस प्रकल्प, प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट आदी प्रकल्प अशी परस्पर विरोधी पत्रे देऊन कारिवडे ग्रामपंचायतीची दिशाभूल केली आहे.

Strong opposition to the waste project, Karivadevasi aggressive | कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध, कारिवडेवासीय आक्रमक

कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध, कारिवडेवासीय आक्रमक

Next
ठळक मुद्देकचरा प्रकल्पाला तीव्र विरोध, कारिवडेवासीय आक्रमक प्रकल्प केल्यास आंदोलन, सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेने कारिवडे येथील सर्व्हे नंबर १२४ (ब), हिस्सा नंबर १, क्षेत्र ५ एकर या जागेत घनकचरा टाकणे व कुंपण भिंत घालण्याचे काम सुरू करणार असल्याचे कळवून एका पत्रामध्ये गांडूळ खत प्रकल्प तर दुसऱ्या पत्रात बायोगॅस प्रकल्प, प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट आदी प्रकल्प अशी परस्पर विरोधी पत्रे देऊन कारिवडे ग्रामपंचायतीची दिशाभूल केली आहे.

कारिवडे येथे होऊ घातलेल्या कचरा प्रकल्पाला आमचा विरोध आहे. असे असताना कचरा प्रकल्प लादण्याचा प्रकार केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. प्रसंगी आंदोलन छेडू, असा इशारा कारिवडे ग्रामस्थांनी दिला आहे.
कारिवडे वासीयांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. तसेच या निवेदनात प्रकल्पाला कारिवडे ग्रामपंचायतीचा विरोध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथे होऊ नये असेही कळविण्यात आले आहे.

या निवेदनावर कारिवडे सरपंंच अपर्णा तळवणेकर, माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, अशोक माळकर, पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुस्कर, आनंद तळवणेकर, तुकाराम आमुणेकर, प्रमिला पालव, अनुपमा चव्हाण, वसंत पार्सेकर, विष्णू तळवणेकर आदींनी सह्या केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या कचरा प्रकल्पावरून राजकारण तापणार आहे.

पालिकेचा प्रकल्प लादण्याचा घाट

निवेदनात म्हटले आहे की, ७ एप्रिल २०१७ रोजी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर व कारिवडे ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले होते.

उपोषणकर्ते व उपविभागीय अधिकारी यांनी चर्चेअंती झालेल्या बोलण्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व कारिवडे ग्रामस्थ त्या जागेची पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले होते. मात्र, त्याबाबत अद्याप उचित कार्यवाही झाली नाही. असे असताना सावंतवाडी नगरपरिषद प्रशासन येथे कायमस्वरूपी कचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेत आहे. तसेच मशिनरीही बसवित आहे.

कचरा डेपो म्हणजे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ

सध्या जनता कोरोनामुळे हैराण आहे. असे असताना प्रशासनाला पुढे करून कचरा प्रकल्प केला जाऊ नये. अन्यथा पालिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे प्रकार झाल्यास आम्हांला आंदोलानाचाही पवित्रा घ्यावा लागेल. कचरा डेपो म्हणजे कारिवडे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ आहे. त्यामुळे हा कचरा डेपो होऊ नये अशी मागणीही यावेळी या पत्रकातून करण्यात आली आहे.

Web Title: Strong opposition to the waste project, Karivadevasi aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.