शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी स्ट्रिंग ऑपरेशन करणं पडलं महागात, आमदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 14:13 IST

पोलिसांकडून माहिती देण्यास नकार

मालवण: आमदार नीलेश राणे यांनी भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन प्रकरणी मालवण पोलिसात नीलेश राणे यांच्यासह तीन ते चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याची माहिती आमदार राणे यांनीच माध्यमांना दिली. याला रवींद्र चव्हाण कारणीभूत असल्याचे सांगत, असले दबाव टाकून मी डगमगणार नाही. त्यांनी मला अजून ओळखले नाही. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही जर हे थांबवलं नाही तर अजून बरंच टोकाला जाणार असल्याचा इशारा आमदार नीलेश राणे यांनी दिला. राणे म्हणाले, माझ्या सह काही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्या संदर्भातील आम्हाला नोटीस दिली आहे. अशा अजून दहा केसेस जरी माझ्यावर झाल्यात तरी मी डगमगणार नाही. पुढचे जे काही तीन-चार दिवस आहेत, मी यांना सोडणार नाही. ते काय कारवाई करतात हे मला पहायचे आहे. या सर्व प्रकारामागे रवींद्र चव्हाण आहेत. त्यांचा माझ्यावर राग आहे. मी अन्य कुठल्याही नेत्याला जबाबदार घरणार नाही. असेही ते म्हणाले. पोलिसांकडून माहिती देण्यास नकारविजय केनवडेकर यांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे का. राणे यांच्यावर कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल आहे याबाबत माध्यमांनी मालवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला.ही फक्त सुरुवात राणे म्हणाले, आम्ही गुन्हा पकडून दिला असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे सोडून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. आज ते मोकाट आहेत. त्यांना जर वाटत असेल की, मी या दबावला बळी पडेन तर त्यांनी मला अजून ओळखलेलं नाही. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही जर हे थांबवलं नाही अजून बरंच टोकाला जाणार आहे. ..मग अटक करामाझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे. नुसती नोटीस देऊन कसं होईल. पुढची प्रोसिजर अटक आहे ना. मग ती पण करा. मी जामिनासाठी अर्ज करेन तेव्हा करेन. तुम्ही तुमची प्रोसिजर करा. मला सर्व माहीत आहे. आपण काय करणार आहात. मलाही हे पहायचे आहे. माझ्यावर असले दबाव टाकून मी डगमगणार नाही किंवा कुठेही मागे हटणार नाही. माझ्या आजूबाजूला हेर लावलेरवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व होत आहे. मी इतके दिवस हेच सांगतच आलो आहे. ते आणि त्यांचा सहाय्यक किती वेळा आणि कुणाकुणाला फोन करतात. ते कुणाकुणाच्या टचमध्ये आहेत हे सर्व मला माहीत आहे. त्यांनी माझ्या आजूबाजूला हेर लावलेले आहेत. माझ्यावर अजून दहा केसेस टाकल्या तरी चालतील. मला जे काही करावयाचे आहे ते मी करणार.मला जे काही दिसतय, मला जिथे पोहोचायचे आहे तिथे मी पोहोचणारच. पोलिसांनी मला थांबवून दाखवावेच. तुम्ही कितीही मला कैचीत पकडायचा प्रयत्न केला तरी मी चक्रव्यूहामध्ये अडकणार नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Official's Sting Operation Backfires: Case Filed Against Nilesh Rane

Web Summary : Nilesh Rane faces charges for a sting operation at a BJP official's home. Rane alleges Ravindra Chavan is behind the action, vowing not to back down. He dares police to arrest him, claiming political motives and surveillance.