शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

नारायण राणेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष; सावंतवाडीतील लढतही होणार रंगतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 3:20 PM

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

- महेश सरनाईक 

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आजच्या घडीला शिवसेना आणि भाजपाची युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी जाहीर केले असले तरी तळागाळातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते जणू मान्य नसल्यासारखेच ते कामाला लागले आहेत. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे हे गेल्या पंधरा- वीस वर्षात कायमच चर्चेतील नेतृत्व असून ते आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात? मालवण-कुडाळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की दुस-या कोणाला उतरवितात, याकडे सध्या संपूर्ण सिंधुदुर्गसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्याच्या राजकारणात कायमच केंद्रबिंदू राहिलेल्या राणेंचा २0१४ च्या निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदार संघातून पराभव झाला आणि जिल्ह्याचे राजकारण पूर्णपणे बदलून गेले. त्यामुळे आता २0१९ च्या निवडणुकीत राणे निश्चितच ‘कमबॅक’ करतील. अशी आशा कार्यकर्त्यांनासह पदाधिका-यांना वाटत आहे. त्यामुळे राणेेंनी याच मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी मागणीही कार्यकर्ते व पदाधिकारी करीत आहेत. नारायण राणेच विद्यमान आमदार वैभव नाईक यांना लढत देऊन विजयश्री खेचून आणू शकतात, अशी धारणा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आहे. अन्यथा नाईक यांनी गेल्या सात ते आठ वर्षात कुडाळ-मालवण या आपल्या मतदार संघात चांगली बांधणी केली आहे. नाईक हे मतदार संघातील प्रत्येक घडामोडीत भाग घेत असतात. त्यामुळे नाईक यांच्या विरोधात राणेच कडवी झुंज देऊ शकतात. त्यामुळे त्यांनी स्वत: निवडणूक लढवावी, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी आहे.

राणे हे सध्या भाजपाकडून राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना आणि भाजप यांची युती जर विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर ते काय भूमिका घेणार, हा प्रश्नच आहे. स्वाभिमान पक्ष संपूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले असल्याने ते खासदारकीवर पाणी सोडणार की खासदार असतानाही विधानसभा निवडणूक लढविणार? की भाजपाशी फारकत घेणार? असे अनेक प्रश्न येथील जनतेसह राज्यातील सर्वच राजकीय विश्लेषकांना पडले आहेत. त्यातच राणे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन १६ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. या कार्यक्रमाला राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना बोलाविले आहे. तसे पाहता या पुस्तकाची प्रस्तावना स्वत: पवार यांनीच लिहिलेली आहे. तर राणे यांचे पवार यांच्यासोबत कायमच सलोख्याचे संबंध राहिले आहेत. 

१६ ऑगस्टच्या राणे यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार नसल्याची वृत्ते प्रसारमाध्यमांमधून दाखविली जात आहेत. त्याचबरोबर राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर भाजपा प्रवेशाच्यावेळी त्यांचे राजकीय विरोधक असणा-या शिवसेनेने वेळोवेळी आडकाठी आणली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात राणे यांनी माजी खासदार नीलेश राणेंना निवडणूक रिंगणात उतरविले होते. वास्तविक राणे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. असे असतानाही त्यांनी युतीच्या उमेदवाराविरोधात आपला लढा येथे कायम ठेवला होता.

विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपाची युती कायम राहिल्यास राणे आता कोणती भूमिका घेणार, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न कायम आहे. जोपर्यंत शिवसेना आणि भाजपा युतीची स्पष्टोक्ती होत नाही, तोपर्यंत राणेंची पुढची खेळी स्पष्ट होणार नाही.  राणे यांनी अगोदरच जाहीर केले आहे की, स्वाभिमान पक्ष राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे त्यांची ती भूमिका स्पष्ट असली तरी राणे स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार की नाही, हे मात्र अजूनही पूर्णपणे गुलदस्त्यातच आहे.

आमदार नितेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथील एका कार्यक्रमात नारायण राणेच कुडाळ-मालवणमधून उमेदवार असतील असे जाहीर वक्तव्य केल्यामुळे त्याबाबतच्या बातम्या सर्वत्र पहायला मिळाल्या. मात्र, नीतेश राणे यांनी मांडलेली ही भूमिका कुडाळ-मालवणमध्ये इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांना थंड करण्यासाठी तर नव्हती ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला अजूनही दोन महिन्यांचा कालावधी आहे. मात्र, त्यामुळे आधीच उमेदवार जाहीर करून नाराजी ओढवण्यापेक्षा आता राणे यांचेच नाव जाहीर झाल्यास सर्वच बंडोबा आपोआप थंड होतील, असाही त्यामागे एक कयास असण्याची दाट शक्यता आहे.

कुडाळप्रमाणे सावंतवाडी मतदार संघातील राजकीय लढाई प्रतिष्ठेची होणार असून, पालकमंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदार संघात घेरण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांकडून एकत्र येण्यासाची रणनीती आखली जात आहे. त्यातच शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात माजी आमदार राजन तेली यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने केसरकर आता त्यांच्या तिसºया निवडणुकीत विरोधकांचे चक्रव्यूह कशा रितीने भेदतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

स्वाभिमान लढणार स्वतंत्रनारायण राणे यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमान या पक्षाची स्थापना केली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे कोकणातील सर्व जागा स्वाभिमान स्वतंत्ररित्या लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राणे आता आपल्या उमेदवारांसाठी कोणाचा पाठिंबा मिळवितात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बबन साळगावकरांची  भूमिका ठरणार लक्षवेधी

दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केसरकरांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे ते कमालीचे चर्चेत आले आहेत. त्यामुळे ते जी भूमिका घेणार ती अतिशय लक्षवेधी ठरणार आहे.

उपरकर टाकत राहणार  राजकीय बाँबगोळे

मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर हे प्रत्येक राजकीय घडामोंडीकडे लक्ष ठेवून असतात आणि ते नेहमीच राजकीय बाँबगोळा टाकण्यात माहीर म्हणून ओळखले जातात.

सर्व शिलेदार एकेकाळी नारायण राणेंचेच

सावंतवाडी मतदार संघातून भाजपाकडून इच्छुक असलेले आणि तसे कामाला लागलेले माजी आमदार राजन तेली, कुडाळ-मालवणमधून इच्छुक असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आणि काँग्रेसकडून कुडाळ-मालवणसाठी इच्छुक असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर हे सर्वच जण एकेकाळचे नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि शिलेदार म्हणून ओळखले जायचे. यातील राजन तेली आणि काका कुडाळकर आता राणेंसोबत नाहीत. सर्व राणेंचेच शिलेदार भविष्यात विविध पक्षांमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ‘सेकंड फळी’ म्हणून पाहिले जात आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्यास भाजपाला नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील तीनपैकी कणकवलीची एकच जागा मिळणार आहे. तर माजी आमदार तेली यांनी सावंतवाडीत जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे युती झाल्यास तेली काय भूमिका घेतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.शिवसेना-भाजपची युती झाल्यास भाजपाला नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील तीनपैकी कणकवलीची एकच जागा मिळणार आहे. तर माजी आमदार तेली यांनी सावंतवाडीत जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे युती झाल्यास तेली काय भूमिका घेतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग