सिंधुदुर्ग: रेंबवलीत एसटी बस-कारची धडक! अपघातात सहाजण जखमी

By सुधीर राणे | Updated: September 7, 2022 14:19 IST2022-09-07T14:18:36+5:302022-09-07T14:19:05+5:30

कणकवली: देवगड तालुक्यात रेंबवली येथे एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक ...

ST bus-car collision in Rembwali Devgad, Six people were injured in the accident | सिंधुदुर्ग: रेंबवलीत एसटी बस-कारची धडक! अपघातात सहाजण जखमी

सिंधुदुर्ग: रेंबवलीत एसटी बस-कारची धडक! अपघातात सहाजण जखमी

कणकवली: देवगड तालुक्यात रेंबवली येथे एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आज, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला.

जखमींमध्ये एसटी बसमधील चार जण तर कारमधील दोघांचा समावेश आहे. यात तीन पुरुष, दोन स्त्रिया आणि एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे.  सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पोलीस तसेच एसटीचे अधिकारी दाखल झाले आहेत.

Web Title: ST bus-car collision in Rembwali Devgad, Six people were injured in the accident