मोठा अनर्थ टळला! मातोंड येथे एसटी आणि बोलेरोला अपघात, चालकांसह एसटीतील प्रवासी सुखरूप
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 10, 2022 14:24 IST2022-09-10T14:20:50+5:302022-09-10T14:24:41+5:30
बस चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मोठा अनर्थ टळला! मातोंड येथे एसटी आणि बोलेरोला अपघात, चालकांसह एसटीतील प्रवासी सुखरूप
वेंगुर्ला - वळणाचा अंदाज न आल्यामुळे एसटी आणि बोलेरो पिकअप यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथे घडली.
बस चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र बोलेरोच्या दर्शनी भागाचे आणि एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली आहे. या झाडीमुळे वाहन चालवताना आणि साईड घेताना दोन मोठ्या वाहनांना अपघात होत आहेत. चार दिवसांपूर्वी शिरगाव येथे असा अपघात झाला होता त्यात २४ जण जखमी झाले होते.