फिशिंग कॉम्पिटिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद, सावंतवाडी नगरपालिकेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 09:30 PM2018-12-15T21:30:56+5:302018-12-15T21:31:27+5:30

सावंतवाडी नगरपालिकेने पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधत येथील मोती तलावात फिशिंग कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते.

Spontaneous response to Fishing Competition, Sawantwadi Municipality | फिशिंग कॉम्पिटिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद, सावंतवाडी नगरपालिकेचे आयोजन

फिशिंग कॉम्पिटिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद, सावंतवाडी नगरपालिकेचे आयोजन

Next

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेने पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधत येथील मोती तलावात फिशिंग कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते. त्याला  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत प्रथम क्रमांक दानिश राजगुरू याने पटकावला. तर द्वितीय क्रमांक विराज सावंत, तृतीय क्रमांक रंगनाथ तुळसकर यांनी पटकावला आहे. या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी स्पर्धकांना खास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, मनोज नाईक, नगरसेविका दीपाली सावंत, भारती मोरे, दीपाली भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, महेश सुकी आदी उपस्थित होते.
शनिवारी सकाळी येथील मोती तलावात फिशिंग कॉम्पिटिशन पार पडले. यामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. अनेकांनी फिशिंगचा आनंद लुटला. सकाळी ७ वाजता स्पर्धेला सुरूवात झाली. अनेक स्पर्धकांनी मोती तलावातून मासे काढून ते परीक्षकांना दाखवले. त्यानंतर ते तलावात सोडले. वेगवेगळ््या  पध्दतीने मासे काढण्यात येत होते. त्यांची लांबी मोजून त्यावर गुण ठरविण्यात येत होते.
सकाळी ८ वाजता सुरू झालेली स्पर्धा दहा वाजेपर्यंत चालली. त्यानंतर मोती तलावाच्या काठावरच स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेतून तीन क्रमांक काढण्यात आले. यात प्रथम क्रमांक दानिश राजगुरू याने पटकावला. तर व्दितीय क्रमांक विराज सावंत व तृतीय क्रमाक रंगनाथ तुळसकर यांनी पटकावला आहे. सर्वांना नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्षांसह मुख्याधिकारी व नगरसेवक उपस्थीत होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी दीपक म्हापसेकर, देविदास आडारकर, बाबा शेख, महेश कुडतरकर, भाऊ भिसे, तानाजी पालव, मनोज शिरोडकर, निलेश तळवणेकर आदींनी मेहनत घेतली.

Web Title: Spontaneous response to Fishing Competition, Sawantwadi Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.