Sindhudurg: भरधाव कार दुभाजकावर आदळली; अपघातात एक ठार, तिघे गंभीर जखमी
By सुधीर राणे | Updated: December 28, 2023 13:37 IST2023-12-28T13:36:23+5:302023-12-28T13:37:19+5:30
कणकवली : मुंबई, घाटकोपर येथून गोव्याला जाणारी भरधाव वेगातील कार क्रमांक (एम.एच. ०३- डी.जी. ७८९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता ...

Sindhudurg: भरधाव कार दुभाजकावर आदळली; अपघातात एक ठार, तिघे गंभीर जखमी
कणकवली : मुंबई, घाटकोपर येथून गोव्याला जाणारी भरधाव वेगातील कार क्रमांक (एम.एच. ०३- डी.जी. ७८९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. मुंबई -गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथील उड्डाणपुलावर आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
कारचालक प्रविण सुंदर शेट्टी (वय४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी काव्यश्री प्रविण शेट्टी (३५), मुलगी आर्वी प्रविण शेट्टी (९) व सिद्धेश भाऊसाहेब सटाले (३०, सर्व रा.घाटकोपर, मुंबई) यांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ, कणकवली पोलिस, महामार्ग पोलिस, वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमींना तत्काळ खासगी वाहनाद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचुर झाला आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.