पद्मभूषण राम सुतार पुरस्काराचा सोनाली पालव यांना बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 15:12 IST2021-04-16T15:09:37+5:302021-04-16T15:12:10+5:30
Kankavli culture Sindhdurug : शहरातील प्रसिद्ध शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांच्या द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२९ व्या वार्षिक कला प्रदर्शनात मांडलेल्या ' द शेफर्ड ' या व्यक्तीशिल्पाला प्रतिष्ठीत जगविख्यात भारतीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार प्राप्त झाला आहे .१५ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . या बहुमानाबद्दल सोनाली पालव यांचे सिंधुदुर्गाच्या सांस्कृतिक चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

पद्मभूषण राम सुतार पुरस्काराचा सोनाली पालव यांना बहुमान
सुधीर राणे
कणकवली : शहरातील प्रसिद्ध शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांच्या द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२९ व्या वार्षिक कला प्रदर्शनात मांडलेल्या ' द शेफर्ड ' या व्यक्तीशिल्पाला प्रतिष्ठीत जगविख्यात भारतीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार प्राप्त झाला आहे. १५ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . या बहुमानाबद्दल सोनाली पालव यांचे सिंधुदुर्गाच्यासांस्कृतिक चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.
१२९ वर्षाची परंपरा असलेल्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कला प्रदर्शनात स्थान मिळणे हे भारतीय चित्रकला आणि शिल्पकला क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते. येथे भारतभरातून आलेल्या शिल्पकारांची मोठी स्पर्धा असते . मात्र , कणकवलीसारख्या ग्रामीण भागातील सोनाली पालव यांच्यासारख्या युवा शिल्पकारांच्या ' द शेफर्ड 'या व्यक्तीशिल्पाला येथे स्थान मिळाले आहे . त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान आणखीनच उंचावली आहे.
या शिल्पामुळे पद्मभूषण राम सुतार पुरस्काराच्या सोनाली या मानकरी ठरल्या आहेत . पद्मभूषण राम सुतार पुरस्कारासंदर्भात सोनाली म्हणाल्या 'द शेफर्ड ' हे शिल्प या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे . आपली लोकजीवनकला विविधांगी आहे . त्या कलेला जोडून घेताना तळातील उपेक्षित वर्ग आणि त्यांचे जीवन आपल्याला कळते आणि त्या जीवनाचे वास्तव दर्शन आपल्याला होते . हेच वास्तव दर्शन मी माझ्या शिल्पकलेतून मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करते . ग्रामीण भागातील ' शेफर्ड लोकजीवनाचं शिल्प मी तयार केले आणि त्याला एवढे मोठे पारितोषिक मिळाले याचा मला आनंद होत आहे. सोनाली पालव याना यापूर्वीही शिल्पकलेसाठी अनेक पारितोषिके मिळाली आहेत.