सिंधुदुर्ग: विलवडेत जन्मदात्या आईचा मुलाने केला खून
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 26, 2022 19:41 IST2022-08-26T19:41:25+5:302022-08-26T19:41:54+5:30
सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वरचीवाडी येथे मुलानेच आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दीपक विष्णू ...

सिंधुदुर्ग: विलवडेत जन्मदात्या आईचा मुलाने केला खून
सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वरचीवाडी येथे मुलानेच आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दीपक विष्णू दळवी (४२) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक याने त्याची आई राधाबाई विष्णू दळवी ७० हिच्या डोक्यावर आणि छातीवर हाताने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके यांनी बांदा येथे भेट देत याप्रकरणी माहिती घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे करीत आहेत.