शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: बुडणाऱ्या पित्याला वाचविण्यासाठी मुलाने ५० फूट खोल विहिरीत उडी घेतली, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:43 IST

पित्याचा मृत्यू; स्थानिकांनी पुत्राला वाचविले: कातवड येथील हृदयद्रावक घटना

मालवण : काही दिवसांपूर्वीच ज्या बागेला 'आगीने' होरपळले होते, त्याच बागेला पुन्हा जीवदान देण्यासाठी विहिरीत उतरलेल्या पित्याचा काळाने घास घेतला. पाइपलाइन दुरुस्त करताना पाय घसरुन गेलेला तोल हाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. बापाला बुडताना पाहून मुलानेही ५० फूट खोल विहिरीत उडी घेतली. मात्र, तो पित्याला वाचवू शकला नाही. स्थानिकांनी बाहेर काढले नसते तर त्याचाही जीव धोक्यात आला असता. गणेश मारुती आचरेकर (वय ५५) असे मृत पित्याचे नाव आहे.विहिरीतील शिडीवरून पाइप दुरुस्त करत असताना गणेश यांचा पाय घसरून तोल गेला. विहिरीची खोली सुमारे ४५ ते ५० फूट असून त्यात १२ ते १५ फूट पाणी होते. उंचावरून पडल्याने आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने गणेश आचरेकर यांचा बुडून जागीच मृत्यू झाला.

रक्ताच्या नात्याची आर्त हाक!गणेश यांना पाण्यात बुडताना पाहून विहिरीच्या काठावर असलेला त्यांचा मुलगा चिन्मय (वय २६) यांनी "बाबा... बाबा..." असा टाहो फोडत विहिरीत उडी घेतली; पण स्थानिकांनी त्याला बाहेर काढले नसते, तर आज आचरेकर कुटुंबावर दुहेरी आघात झाला असता.'आगी'नंतर आलेल्या 'पाण्या'ने घात केला!आचरेकर यांची आंबा बाग आगीत जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. झाडांना पाणी मिळावे म्हणून जळालेली पाइपलाइन दुरुस्त करायला गेलेल्या गणेश यांना 'पाण्यानेच' मृत्यूच्या कचाट्यात ओढले. आगीतून सावरण्यापूर्वीच पाण्याचा हा घाला कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेला.

स्थानिक तरुणांचे मदतकार्यसाईल परब, अनिष धुरी, बाबल धुरी, नीलेश परब यांच्यासह स्थानिक तरुणांनी तत्काळ विहिरीत उड्या घेतल्यामुळे चिन्मयचे प्राण वाचू शकले. पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Son Jumps into Well to Save Father; Father Dies

Web Summary : In Sindhudurg, a man died after falling into a well while repairing a pipeline. His son jumped in to save him but was unsuccessful. Local youth rescued the son. The family had recently suffered losses from a fire.