सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीची किंजवडे ग्रामपंचायतीला भेट, स्वच्छता विषयक उपक्रमांची घेतली माहिती
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 20, 2024 19:09 IST2024-02-20T19:09:25+5:302024-02-20T19:09:58+5:30
देवगड ( सिंधुदुर्ग ) : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३/२४ अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानची ...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीची किंजवडे ग्रामपंचायतीला भेट, स्वच्छता विषयक उपक्रमांची घेतली माहिती
देवगड (सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३/२४ अंतर्गत सोलापूरजिल्हा परिषदेच्या समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानची भुमी म्हणून ओळखले जाणाऱ्या किंजवडे ग्रामपंचायतीला भेट दिली. तसेच स्वच्छता विषयक राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
अक्कलकोट गटविकास अधिकारी माळशिरस, विस्तार अधिकारी यांसह सरपंच, उपसरपंच सदस्य, मुख्यसेविका उपस्थित होते. यावेळी किंजवडे गावचे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी समिती सदस्याचे स्वागत केले व ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी गावाची माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण टेबुलकर, प्रविण तेली व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
समितीने गावातील पाऊस पाणी संकलन प्रकल्प, गावातील सार्वजनिक वाचनालय आणि सोलर आँन ग्रेड सिस्टीम, डिजिटल अंगणवाडी. गावातील ऐतिहासिक वृक्ष गणना, गावातील जैवविविधता बदल माहिती व प्रत्यक्ष पाहणी. झ-यावरील पाणी पुरवठा. बायोगॅस संयत्र, शौचालय वापर व देखभाल संदर्भात माहिती, विविध उपक्रमांना भेट दिली. महिला बचत गटाच्या विविध प्रकारच्या उत्पादन पाहून समितीने मना पासून कौतुक केले.
जिल्हा परिषदसोलापूर अंतर्गत उपस्थित सरपंच, उपसरपंच यांनी विविध उपक्रमांची माहीती घेत यातील कोणता प्रकल्प आपल्या गावात राबवता येईल याचा अभ्यास केला. किंजवडे गावचे ग्रामदैवत स्थानेशवर देवस्थानचे दर्शन घेऊन गावातील माहिती बदल समाधान व्यक्त केले. ही समिती मनीषा आव्हाळे, भा.प्र. से. मुख्यकार्यकारी अधिकारी व इशादिन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांचे मार्गदर्शना खाली आले होते.