सिंधुदुर्ग : शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू, फुरसे सर्पाने केला दंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:16 IST2018-08-17T16:14:59+5:302018-08-17T16:16:56+5:30
कुणकेश्वर-कातवणेश्वर येथील रमेश दाजी लब्दे (५५) या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी घडली.

सिंधुदुर्ग : शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू, फुरसे सर्पाने केला दंश
देवगड : कुणकेश्वर-कातवणेश्वर येथील रमेश दाजी लब्दे (५५) या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश लब्दे हे १४ आॅगस्ट रोजी आपल्या बागेत काम करीत असतानाच त्यांच्या हाताला फुरसे जातीच्या सर्पाने दंश केला. त्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कणकवली येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरूवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा खासगी रूग्णालयात मृत्यु झाला.
याबाबत संतोष हरी लब्दे यांनी देवगड पोलीस स्थानकात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली असून तपास पोलीस नाईक राजन पाटील करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागात सर्पदंशाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे.
मागील आठवड्यात बहुतांशी भागात पाऊस पूर्णपणे थांबला होता. तसेच काही ठिकाणी कडक ऊन पडत असल्याने सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणावर बाहेर येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.