सावंतवाडीतील त्वचारोग तज्ञ संजय वंदाळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:30 IST2018-11-01T01:27:47+5:302018-11-01T01:30:10+5:30

सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात त्वचारोग तज्ञ म्हणून कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी संजय वंदाळे यांचे निधन झाले.

skin specialist sanjay vandale passed away | सावंतवाडीतील त्वचारोग तज्ञ संजय वंदाळे यांचे निधन

सावंतवाडीतील त्वचारोग तज्ञ संजय वंदाळे यांचे निधन

सिंधुदुर्ग : सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात त्वचारोग तज्ञ म्हणून कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी संजय वंदाळे यांचे निधन झाले. ही घटना आज रात्री उशिरा बेळगाव येथे घडली. याबाबतची माहिती डॉ. भगवान पितळे यांनी दिली आहे. वंदाळे हे काही दिवस आजारी होते. त्यांनी येथील कुटीर रुग्णालयात त्वचारोग तज्ञ काम केले होते त्यांचा सावंतवाडीत दवाखाना आहे.

सावंतवाडी काँटेज रुग्णालयात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या वंदाळे यांच्या घशावर दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते सावंतवाडीत पुन्हा दाखल झाले होते. मध्यंतरी ते जिल्हा रुग्णालयात प्रभारी सिव्हिल सर्जन म्हणून कार्यरत होते. अलिकडेच त्यांना पुन्हा सावंतवाडीत पाठविले होते. मात्र काही दिवस सेवा बजावल्यावर पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर कोल्हापूर, बेळगाव येथे उपचारही करण्यात आले होते. मात्र त्यांचा आजार बळावत गेला व बुधवारी रात्री बेळगाव येथे त्यांचे निधन झाले.

Web Title: skin specialist sanjay vandale passed away