शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात बाजी कोणाची ?

By admin | Updated: October 19, 2014 00:25 IST

उत्सुकता शिगेला : कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीकडे राज्याचे लक्ष

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तीन ते चार तासांत सर्व निकाल लागणार असून दुपारपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांवर कोण बाजी मारणार ते स्पष्ट होणार आहे. सातव्यांदा निवडणुकीत असलेल्या आणि काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांच्या कुडाळमधील लढतीकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी राणे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या निकालावर जिल्ह्यातील आगामी राजकारणाची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व ठिकाणाचे निकाल हाती येतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणूक मतमोजणीची सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून, निवडणूक लढविलेल्या एकूण २४ उमेदवारांतून विजयी तीन उमेदवार कोण? हा फैसला उद्या, रविवारी होणार आहे. त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे, तर मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.विजयी होणारे उमेदवार कोण? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यासाठी उद्या, रविवारी कणकवली, सावंतवाडी व सिंधुदुर्गनगरी येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.मतमोजणीच्या तिन्ही ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीवेळी होणारी पक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. जिल्ह्याबाहेरील पोलीस बळाची मदत घेण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी १५ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)