Sindhudurg ZP Election Results 2026: कोकणात महायुतीचा ‘बालेकिल्ला’ अभेद्य; उद्धवसेनेचे पानिपत
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 9, 2026 12:22 IST2026-02-09T12:20:11+5:302026-02-09T12:22:09+5:30
उद्धवसेनेला अजून साधे खातेही उघडता आले नाही

Sindhudurg ZP Election Results 2026: कोकणात महायुतीचा ‘बालेकिल्ला’ अभेद्य; उद्धवसेनेचे पानिपत
सिंधुदुर्ग: कोकणच्या राजकीय रणांगणात जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा पार धुरळा उडवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच ‘महायुती’चा झंझावात पाहायला मिळत असून, ७ पैकी ७ जागांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचे चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कोकण हा ज्यांचा बालेकिल्ला मानला जायचा, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (उद्धवसेना) अजून साधे खातेही उघडता आलेले नाही.
ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा समीकरणांमध्ये भाजपने १५ जागांवर मुसंडी मारली आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ६ जागांवर आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, ३ ठिकाणी अपक्षांनी आपले वर्चस्व सिद्ध करत प्रस्थापितांना धक्का दिला आहे.
विरोधकांचा पूर्णपणे सफाया करत महायुती आता जिल्ह्यात 'क्लिन स्वीप' देण्याच्या तयारीत आहे. राणे कुटुंबीयांचा करिष्मा आणि मुख्यमंत्री शिंदेंची रणनीती यामुळे सिंधुदुर्गात पुन्हा एकदा भगवा आणि कमळ जोमाने फडकत असल्याचे पाहायला मिळत आहे.