शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

सिंधुदुर्ग : जानवली येथे पिस्तूलातून गोळीबार, ठार मारण्याची धमकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 5:13 PM

कणकवली शहरापासून जवळच असलेल्या जानवली येथे एका बिल्डर कडून फ्लॅट धारकाला ठार मारण्याची धमकी देत पिस्तुलातून गोळीबार करण्याची घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. बिल्डर आणि फ्लॅटधारकामध्ये असलेल्या बांधकामाच्या वादाची पार्श्वभूमी या घटनेमागे आहे. ही घटना रविवारी सकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कणकवली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजानवली येथे पिस्तूलातून गोळीबार,  ठार मारण्याची धमकी बिल्डर व फ्लॅटधारकातील वादाचे निमित्त

कणकवली : कणकवली शहरापासून जवळच असलेल्या जानवली येथे एका बिल्डर कडून फ्लॅट धारकाला ठार मारण्याची धमकी देत पिस्तुलातून गोळीबार करण्याची घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. बिल्डर आणि फ्लॅटधारकामध्ये असलेल्या बांधकामाच्या वादाची पार्श्वभूमी या घटनेमागे आहे.फ्लॅटधारक तथा जानवली वाकड़वाडी येथील साईसृष्टि गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष किशोर अनंत दाभोलकर यांनी या घटनेबाबत कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसानी बिल्डर सुभाष श्रीधर भोसले यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करीत आहे.या घटनेबाबत किशोर दाभोलकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते जानवली आदर्शनगर येथील साईसृष्टी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचे विरोधक सुभाष श्रीधर भोसले हे त्या सोसायटीचे विकासक बिल्डर आहेत.

सुमारे चार वर्षापुर्वी किशोर दाभोलकर यांनी ग्राहकमंचाकडे निकृष्ट बांधकाम करून आपली फसवणूक केली म्हणून सुभाष भोसले यांच्या विरोधात तक्रार केली होती. तसेच सोसायटी मार्फत सन 2015 मध्ये सार्वजनिक सोयी सुविधा तसेच अनधिकृत बांधकाम या कारणासाठी दिवाणी न्यायालयात दावाही दाखल केला आहे. तेव्हापासून किशोर दाभोलकर व सुभाष भोसले यांच्यात बोलाचाली नाही .किशोर दाभोलकर हे नेहमी सकाळी ते रहात असलेल्या साईंसृष्टी सोसायटी ते जानवली साटमवाडी येथील गणेशमंदीर पर्यन्त मॉर्निंग वॉकसाठी जातात. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असता आपल्या विरोधात तक्रार केली हा राग मनात धरून सुभाष भोसले हे स्कूटर घेऊन त्यांच्या मागोमाग गेले. तसेच जानवली साकेडी फाट्यानजिक स्कूटरवरुन खाली उतरुन किशोर दाभोलकर यांच्याकडे रागाने बघुन 'थांब तुला ठार मारतो ' असे बोलून बाजूस असलेल्या कुत्र्याच्या दिशने आपल्या हातातील काळपट रंगाच्या पिस्तुलाने दोन फायर केल्या. असेही या तक्रारीत म्हटले आहे.ही घटना घडल्यानंतर घाबरलेल्या किशोर दाभोलकर यांनी आपल्या काही नातेवाईक तसेच मित्रांना या घटनेबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या सोबत कणकवली पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर बिल्डर सुभाष भोसले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.पोलिस तपासणीसाठी बिल्डरच्या घरी !किशोर दाभोलकर यांनी तक्रार नोंदविल्यावर पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी तसेच पथक तत्काळ जानवली येथील घटनास्थळी रवाना झाले. त्याठिकाणी त्यांनी गोळ्यांच्या पुंगळ्याचा शोध घेतला. मात्र त्या आढळून आल्या नाहीत. त्यानंतर पिस्तुलची पहाणी करण्यासाठी भोसले यांचे घर गाठले. यावेळी भोसले कामानिंमित्त घरा बाहेर गेले असल्याचे त्यांचे सुपुत्र कणकवली नगरपंचायतीचे आरोग्य सभापती विराज भोसले यांनी सांगितले.

पोलिसांनी पिस्तूल बाबत विचारणा केली असता ते सुभाष भोसले यांच्याकडे असते . असे त्यांनी सांगितले तसेच त्याचा परवाना दाखविला. त्यामुळे भोसले हे घरी आल्यावर त्याना कणकवली पोलिस ठाण्यात घेवून या असे विराज भोसले यांना सांगत पोलिस पथक माघारी परतले.पिस्तूलाची फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी करणार !किशोर दाभोलकर यांच्या तक्रारीवरुन सुभाष भोसले यांच्या विरोधात गोळीबार प्रकरणी अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल असला तरी त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार झाला आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेवून पुढील तपास करण्यात येईल.

तसेच त्यांचे पिस्तूल फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तेथील अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल . त्याचप्रमाणे पिस्तुल वापरण्याचा परवाना असला तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा अनावश्यक वापर करणे गैर आहे. त्यामुळे आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीनेही कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग