शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

सिंधुदुर्ग : उन्हाळी सुटीसाठी एसटीच्या गाड्या,कोकणसाठी विशेष सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 7:49 PM

यावर्षी सुटीच्या कालावधीत कोकण मार्गावर विविध स्थानकातून जादा गाड्या तसेच काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटीच्या कालावधीत आपल्या मूळ गावी येणाऱ्यांचा प्रवास काहीसा सुखकर होणार आहे.

ठळक मुद्देउन्हाळी सुटीसाठी एसटीच्या गाड्या,कोकणसाठी विशेष सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी मुंबईकरांची लगबग

कणकवली : यावर्षी सुटीच्या कालावधीत कोकण मार्गावर विविध स्थानकातून जादा गाड्या तसेच काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटीच्या कालावधीत आपल्या मूळ गावी येणाऱ्यांचा प्रवास काहीसा सुखकर होणार आहे.उन्हाळ्याची सुटी पडताच मुंबईकरांची कोकणात जाण्याची लगबग सुरू होते. मूळचे कोकणचे असले तरी कामानिमित्ताने मुंबईत स्थायिक झालेले कोकणवासीय आपापल्या गावाकडे जाण्यासाठी पहिली पसंती रेल्वेला देत असले तरी एसटी महामंडळाच्या लाल डब्याकडे आपोआप अनेकांचे पाय वळतात.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता एसटी महामंडळाने मुंबई व ठाणे विभागातून कोकणात जाण्यासाठी जादा गाड्यांची सोय केली आहे.मुंबईतून सुटणाऱ्या एसटी गाड्या पुढीलप्रमाणे आहेत. मुंबई सेंट्रलवरून - ५ वाजता मुंबई-दापोली, ५.३० वाजता मुंबई-देवरुख, ६ वाजता मुंबई-कुंभेशिवथर, ६ वाजता मुंबई-गुहागर, ६.३० वाजता मुंबई-दापोली (निमआराम), ७ वाजता मुंबई-रत्नागिरी, ११.३० वाजता मुंबई-श्रीवर्धन (निमआराम), १६.०० वाजता मुंबई-कणकवली, १६.३० वाजता मुंबई-मालवण (निमआराम), २०.१५ वाजता मुंबई-रत्नागिरी, २०.३० वाजता मुंबई-रत्नागिरी, २०.४५ वाजता मुंबई-रत्नागिरी, २०.५० वाजता मुंबई-रत्नागिरी, २१.०० वाजता मुंबई-पांगारी, २२.०० वाजता मुंबई-गुहागर (निमआराम), २२.१५ वाजता मुंबई-दापोली (निमआराम), २२.४५ वाजता मुंबई-दापोली, ००.३० वाजता मुंबई-महाड.

परळवरून - ८ वाजता परळ-कांडवण, १७.३० वाजता परळ-गगनबावडा, २०.०० वाजता परळ-नेसरी, २२.३० वाजता परळ-दापोली. बोरिवलीवरून - ४.३० वाजता बोरिवली-मुरुड, ६ वाजता बोरिवली-गोवेले, ६.१५ वाजता बोरिवली-गुहागर, ६.३० वाजता बोरिवली-देवरुख, ७.३० वाजता बोरिवली-रत्नागिरी, ८.३० वाजता बोरिवली-खेड, १५.०० वाजता बोरिवली-तुळशी-खेड, १६.०० वाजता बोरिवली-कणकवली, १६.०० वाजता बोरिवली-विजयदुर्ग, १६.३० वाजता बोरिवली-कुडाळ, १६.४५ वाजता बोरिवली-देवगड,

१७.०० वाजता बोरिवली-देवगड, १७.०० वाजता बोरिवली-कणकवलीमार्गे पाचल, १७.०० वाजता बोरिवली-कुडाळ, १९.०० वाजता बोरिवली-येळवण, १९.३० वाजता बोरिवली-गुहागर, १९.४५ वाजता बोरिवली-लांजा, २०.०० वाजता बोरिवली-मंडणगडमार्गे भोळवली, २०.०० वाजता बोरिवली-रत्नागिरी, २०.१५ वाजता बोरिवली-रत्नागिरी, २०.३० वाजता बोरिवली-मंजुत्री, २०.३० वाजता बोरिवली-रत्नागिरी-जयगड बंदर, २१.१५ वाजता बोरिवली-करजुवे तिसंग, २१.३० वाजता बोरिवली-रहाटाड, २२.०० बोरिवली-खेड, २३.०० बोरिवली-शिवतर, २३.०० बोरिवली-चिपळूण, ००.३० बोरिवली-महाड.नालासोपारावरून - ४.४५ वाजता नालासोपारा-श्रीवर्धन, ५ वाजता नालासोपारा-मुरुड, ५.३० वाजता नालासोपारा-खुटील, ६.३० नालासोपारा-रत्नागिरी, ८ वाजता नालासोपारा-केळशी पिंपरपार, १७.०० वाजता नालासोपारा-राजापूर, १८.०० वाजता नालासोपारा-बुरुंबेवाडी, १९.४५ न ालासोपारा-खरवते, २०.०० नालासोपारा-माखजन.विरारहून - ७ वाजता विरार-गुहागर, १९.४५ विरार-गुहागर. ठाणेहून - ६.३० वाजता ठाणे-फौजी आंबवडे, ७ वाजता ठाणे-पन्हाळजे, १० वाजता भार्इंदर-गुजरकोंड-मंडणगड, ८ वाजता ठाणे-कावळेगांव, २१.३० वाजता ठाणे -शिंदी, २१. ३० ठाणे-उंबरघर, २३.०० वाजता ठाणे-चिपळूणभांडूपहून- ७ वाजता भांडूप- महाड, ८ वाजता भांडूप-माखजन, २०.४५ भांडूप- खेड, २१.०० भांडूप-चिपळूण, २१.१५ भांडूप-गुहागर. कल्याणहून - २०.०० कल्याण-देवरुख, २१.०० कल्याण-दापोली. विठ्ठलवाडीहून - ०५.४५ विठ्ठलवाडी -चिपळूण, २१.३० विठ्ठलवाडी-चिन्द्रावले गराटेवाडी, २२.०० वाजता विठ्ठलवाडी-दापोली आदी गाड्यांचा समावेश आहे.प्रवास सुखकर करावाया जादा एसटी गाड्या मुंबई सेंट्रल, परळ, बोरिवली, ठाणे, नालासोपारा, विरार, भांडूप व विठ्ठलवाडी बसस्थानकातून सुटणार आहेत. नियमित सुटणाºया गाड्यांव्यतिरिक्त या जादा गाड्या असणार आहेत. या गाड्यांचा लाभ घेऊन प्रवाशांनी आपला प्रवास सुखकर करावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणstate transportराज्य परीवहन महामंडळ