भाजपचे जिल्हा बँकेचे उमेदवार मनिष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 14:58 IST2021-12-30T14:56:23+5:302021-12-30T14:58:13+5:30
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मनीष दळवी यांना यांचे नाव पुढे आले होते.

भाजपचे जिल्हा बँकेचे उमेदवार मनिष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला
सिंधुदुर्ग: शिवसेना उमेदवार तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत याचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी संशयित म्हणून पोलिसांच्या रडारवर असलेल्या वेंगुर्ले येथील मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी नाकारला आहे. विशेष म्हणजे दळवी हे जिल्हा बँकेसाठी उमेदवारही आहेत.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत मनीष दळवी यांना यांचे नाव पुढे आले होते. दळवी हे आज निवडणूक होत असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत वेंगुर्ला तालुका मतदार संघातून उभे आहेत. त्यामुळे आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्या करिता अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात गेले होते. त्यावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगत न्यायाधीश यांनी मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन नाकारला. मात्र त्यांच्या अटकपूर्व जामीनावर दुपार नंतर सुनावणी होणार आहे.