सिंधुदुर्ग : महामार्ग ठेकेदाराच्या नियमबाह्य कामांचा करणार पोलखोल; परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 03:40 PM2019-01-07T15:40:56+5:302019-01-07T15:43:00+5:30

ष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कसाल येथील कार्यालयात मनसेच्यावतीने केलेले ठिय्या आंदोलन उपअभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, महामार्ग चौपदरीकरण करत असताना ठेकेदारांकडून अवैध माती उत्खनन, खडीचे उत्खनन व निकृष्ठ दजार्चा रस्ता केला जात आहे. त्या पार्श्वभूमिवर मनसेच्या माध्यमातून ९ जानेवारी रोजी कार्यकारी अभियंत्यांसमोर या नियमबाह्य कामाची पोलखोल करण्यात येणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

Sindhudurg: Polkhol did the work of highway contractor; Parshuram Upkar | सिंधुदुर्ग : महामार्ग ठेकेदाराच्या नियमबाह्य कामांचा करणार पोलखोल; परशुराम उपरकर

सिंधुदुर्ग : महामार्ग ठेकेदाराच्या नियमबाह्य कामांचा करणार पोलखोल; परशुराम उपरकर

Next
ठळक मुद्देमहामार्ग ठेकेदाराच्या नियमबाह्य कामांचा करणार पोलखोल परशुराम उपरकर यांचा इशारा

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कसाल येथील कार्यालयात मनसेच्यावतीने केलेले ठिय्या आंदोलन उपअभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, महामार्ग चौपदरीकरण करत असताना ठेकेदारांकडून अवैध माती उत्खनन, खडीचे उत्खनन व निकृष्ठ दजार्चा रस्ता केला जात आहे. त्या पार्श्वभूमिवर मनसेच्या माध्यमातून ९ जानेवारी रोजी कार्यकारी अभियंत्यांसमोर या नियमबाह्य कामाची पोलखोल करण्यात येणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामार्ग चौपदीकरण करत असताना अनेक शेतक?्यांना अद्यापही नोटीसा व मोबदला देण्यात आलेला नाही. उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी शेतक?्यांची निवेदने स्वीकारून त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. एका झाड़ा बद्दल पाच झाडे लावलेल्या शेतक?्यांना गेले सात महिने अनुदान दिलेले नाही.असे २८ शेतकरी आमच्या आंदोलनात सहभागी झाले होते.त्यांना वा?्यावर सोडण्याचे काम महामार्ग प्राधिकरणने केलेले आहे.

यापूर्वी माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी देखील महामार्ग ठेकेदाराच्या मनमानी विरोधात आंदोलन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी न करता ठेकेदार काम करत असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी यावेळी केला.

महामार्ग ठेकेदार मंत्रालयात बसून अधिका?्यांवर दबाव टाकून वाटेल तसे काम करत आहे. जानवलीच्या नवीन पुलाला भेगा पडल्या आहेत.त्यामुळे मनसे जनतेच्या हिताच्या दृष्टीने मुख्य अभियंत्यांशी चर्चा करणार आहे. जोपर्यंत जनतेच्या समस्यांवर ठेकेदार व अधिकारी हालचाल करणार नाहीत, तोपर्यंत मनसे गप्प बसणार नाही.

वेळप्रसंगी रस्ता रोको किंवा अन्य मागार्ने आंदोलन करण्यात येईल. पालकमंत्री, आमदार, खासदार जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत.धुळीचा प्रादुर्भाव, निष्कृष्ठ दर्जाच्या कामाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याप्रमाणेच ठेकेदार काम करत असल्याचा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला. तसेच ठेकेदाराकडून वाढीव बिले अधिका?्यांच्या संघनमताने काढली जात असल्याचेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: Sindhudurg: Polkhol did the work of highway contractor; Parshuram Upkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.