शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

सिंधुदुर्ग : नाटळ शाळेचा भाग कोसळला, संततधार पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 3:04 PM

सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केंद्रशाळा नाटळ राजवाडीच्या खोलीचा काही भाग रात्री अचानक कोसळला. परंतु, कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. 

ठळक मुद्दे नाटळ शाळेचा भाग कोसळला, संततधार पावसाचा फटका रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला

कनेडी : सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केंद्रशाळा नाटळ राजवाडीच्या खोलीचा काही भाग रात्री अचानक कोसळला. परंतु, कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. या शाळेत प्राथमिकचे पहिली ते चौथी व अंगणवाडीचे वर्ग चालविले जातात. शाळा रस्त्याच्या बाजूलाच असल्याने रहदारी जास्त आहे. केंद्रप्रमुख, दोन शिक्षक येथे कार्यरत आहेत. पूर्वी सातवीपर्यंत असलेल्या या शाळेमध्ये सात वर्ग होते. सध्या विद्यार्थी संख्या कमी झाल्याने या शाळेत पहिली ते चौथीचेच वर्ग सुरू आहेत.

बाकीचे वर्ग नादुरूस्त आहेत. हे नादुरूस्त वर्ग पडण्याच्या स्थितीत आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने हे वर्ग निर्लेखित करण्यासंदर्भात बांधकाम तसेच शिक्षण विभागाला गेल्यावर्षी ठराव दिला होता. परंतु, सुशेगात असणाऱ्या शासनाने दखल न घेतल्याने ही घटना घडली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.गावाच्या मध्यभागी असलेल्या या शाळेच्या तीन वर्गखोल्यांचे दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले आहे. सध्या याच वर्गात विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. केंद्रबलाचे केंद्रप्रमुख याच शाळेमध्ये बसतात. शाळेच्या आवारात अंगणवाडी असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची रेलचेल येथे असते. विद्यार्थी शाळेत जेथून प्रवेश करतात त्या प्रवेशद्वारावरच हा अपघात घडला आहे.शासन बेफिकीरही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला. सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी याची पाहणी केली. शासनाच्या बेफिकीरीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संभाव्य अपघाताची शक्यता ओळखून गेल्यावर्षी या खोल्यांचे निर्लेखन करण्यासंदर्भाचे पत्र संबंधित खात्याला देण्यात आले होते. परंतु, बेफिकीर राहिलेल्या शासनाने त्याची दखल घेतली नाही.

शासनाच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली आहे. अपघात रात्रीच्यावेळी घडल्याने जीवितहानी झाली नाही. मोठा अनर्थ टळला. नादुरूस्त वर्ग तत्काळ निर्लेखित न केल्यास आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग