शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिंधुदुर्गनगरी : एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढीबाबत निराशा, १३ संघटनांचे प्रयत्न निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 16:35 IST

एसटी कामगारांच्या १३ संघटनांनी सातव्या वेतन आयोगासाठी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र या संपाचा काहीही उपयोग झाला नसल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे.

ठळक मुद्देएसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढीबाबत निराशाकामगारांमध्ये नाराजी : १३ संघटनांचे प्रयत्न निष्फळ

कणकवली : एसटी कामगारांच्या १३ संघटनांनी सातव्या वेतन आयोगासाठी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र या संपाचा काहीही उपयोग झाला नसल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे.

२६ व २७ मे २०१७ रोजी सर्व कामगार संघटनांनी मतदान घेऊन पगारवाढीची मागणी केली होती. मात्र अजूनही या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पगारवाढ मिळाली नसल्याबद्दल कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पगारवाढीबाबत एसटी कर्मचाऱ्यांची निराशा झाली असून एसटीच्या १३ संघटनांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.एसटी कामगारांना मिळणारे वेतन अतिशय कमी आहे. महामंडळाच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीनुसार ४-४ वर्षांचे आर्थिक करार करण्यात आल्यामुळे कालांतराने कर्मचाऱ्यांच्या वेतनात इतरांच्या तुलनेत तफावत होत गेली.

४ वर्षांच्या करार पध्दतीने कामगारांच्या वेतनात अपेक्षित वाढ होत नाही. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोग मिळावा, अशी मागणी एसटीच्या कामगारांनी केली आहे.कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटावा, त्यांच्या वेतनात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढ व्हावी यासाठी सर्व कामगार संघटना एकत्र झाल्या होत्या. विसंवादातून सुसंवादाकडे वाटचाल व्हावी म्हणून एसटीतील इतर सर्व संघटनांना एकत्र येण्याबाबत विनंती करण्यात आली होती.त्यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, संघर्ष ग्रुप व कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना एकत्रित आल्या. इतर जण मात्र सत्ताधारी पक्षाच्या संघटनेबरोबर गेले व तात्पुरत्या लाभाचा टक्केवारी करार करण्यासाठी कृती समिती स्थापन केली होती. मात्र या कृती समितीचा काहीही फायदा झाला नसल्याचे एसटीच्या कामगारांचे म्हणणे आहे.प्रशासनाने सातवा वेतन आयोग नाकारताना परिवहन महामंडळाचे कर्मचारी व शासनाचे कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप भिन्न आहे, असे सांगितले आहे. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा परिवहन महामंडळाचे कर्मचारी जोखमीचे काम करतात. त्यामुळे परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग वेतनश्रेणीसह मिळणे आवश्यक असल्याचे इंटक व कामगार संघटनेचे म्हणणे आहे.एमआरटीयू अँड पीयूएलपी अ‍ॅक्ट १९७१ मधील तरतुदीनुसार संप करावयाचा झाल्यास कामगारांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी २६ व २७ मे २0१७ रोजी मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.वेतन देताना वेगळा नियम का ?मान्यताप्राप्त संघटनेबरोबरच्या वाटाघाट समितीच्या बैठकीत प्रशासनाने सातवा वेतन आयोग देण्यास स्पष्ट नकार दिला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनात महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, मुख्य अभियंता, महाव्यवस्थापक ही पदे शासनाने नियुक्त केलेली आहेत. त्यांचे वेतनही शासनाप्रमाणे आहे.शासनाच्या विविध योजना महामंडळ राबविते. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता, रजा, अनुकंपाप्रकरणी नोकरी, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देताना शासनाचे नियम बंधनकारक आहेत. मग वेतन देताना वेगळा नियम का, असा सवाल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळsindhudurgसिंधुदुर्ग