सिंधुदुर्ग :भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला, निरवडे-भंडारवाडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:47 IST2018-08-07T14:12:33+5:302018-08-07T14:47:07+5:30
भक्ष्याच्या शोधात जंगलातून लोकवस्तीत आलेला बिबट्या निरवडे-भंडारवाडी येथील एका विहिरीत मंगळवारी सकाळी आढळून आला आहे. ही विहीर शाळेच्या शेजारी असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्ग :भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला, निरवडे-भंडारवाडी येथील घटना
सावंतवाडी : भक्ष्याच्या शोधात जंगलातून लोकवस्तीत आलेला बिबट्या निरवडे-भंडारवाडी येथील एका विहिरीत मंगळवारी सकाळी आढळून आला आहे.
ही विहीर शाळेच्या शेजारी असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले असून, बिबट्याला विहिरीतून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मळगाव-निरवडे जंगलात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. यातील एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीतकडे येत असताना विहिरीत पडला.
ही विहीर खोल नसली तरी मोठा खड्डा आहे. त्यात पाणीही जास्त आहे. त्यामुळे बिबट्या पाण्यावर तरंगताना दिसत होता. सकाळी तो ग्रामस्थांच्या नजरेस पडल्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.
वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून, बिबट्याला काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.