शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

सिंधुुदुर्ग : पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, बांदा येथील आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:33 PM

माकडतापाने सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, बांदा येथील आढावा बैठक माकडतापाच्या साथीबाबत प्रत्येकाने चोख भूमिका बजावण्याच्या सूचन

सिंधुुदुर्ग : माकडतापाने सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.

माकडतापाच्या साथीमुळे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दुसऱ्यावर न ढकलता चोखपणे पार पाडावी. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे संकेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. यावेळी वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या कामाबाबत पालकमंत्री केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.माकडताप बाधित क्षेत्रातील गावांमध्ये २४ तास वनखात्याने पथके कार्यरत ठेवावीत. आरोग्य विभागानेही प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार करुन योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या.

यावेळी केसरकर यांनी माकडतापाने बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बांदा आरोग्यकेंद्राचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माकडतापाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम, दोडामार्ग तहसीलदार रोहिणी राजपूत, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. संदेश कांबळे, सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, दोडामार्ग शिवसेना तालुुकाप्रमुख बाबुराव धुरी, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सुशांत पांगम, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदींसह वनविभाग, आरोग्य विभाग, पशुधन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बदली करणार : दीपक केसरकरबांदा परिसरात माकडतापासारखी गंभीर परिस्थिती असताना जिल्ह्यातील आरोग्य, वनविभाग आणि संबंधित कोणत्याच विभागाचा मुख्य अधिकारी त्या गावापर्यंत पोहोचला नसल्याने पालकमंत्री केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आपण ज्या जिल्ह्यात काम करतो त्याबाबत आत्मीयता असली पाहिजे.

सर्वांगीण विकास होण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य अधिकारी चांगले असणे गरजेचे आहे. मात्र या अधिकाºयांना त्याची फिकीर नसल्याने लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करून त्याजागी चांगले अधिकारी बसविणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य