सावंतवाडी तालुक्यात आणखी एका पर्यटनस्थळाची भर, मळगाव धबधब्याला मिळाली चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:29 PM2017-12-09T16:29:50+5:302017-12-09T16:42:19+5:30

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावच्या हद्दीत नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील मळगाव घाटीतील धबधब्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्याने पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे तालुक्यात आणखी एका पर्यटनस्थळाची भर पडणार आहे.

Another tourist attraction in Sawantwadi taluka has been received from Malgaon waterfowl |  सावंतवाडी तालुक्यात आणखी एका पर्यटनस्थळाची भर, मळगाव धबधब्याला मिळाली चालना

सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील मळगाव घाटीतील धबधबा

googlenewsNext
ठळक मुद्दे सावंतवाडी तालुक्यात आणखी एका पर्यटनस्थळाची भर, मळगाव धबधब्याला मिळाली चालनाकाम लवकर पूर्ण करणार : समाधान चव्हाण, उपवनसंरक्षकपालकमंत्री केसरकर यांच्या सहकार्याने धबधब्याला पर्यटनस्थळाचे स्वरूप

रामचंद्र कुडाळकर 

तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावच्या हद्दीत नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील मळगाव घाटीतील धबधब्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्याने पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे तालुक्यात आणखी एका पर्यटनस्थळाची भर पडणार आहे.


मळगाव ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून वनखात्याकडे पाठपुरावा करून हा धबधबा विकसित होत आहे. मळगाव वनसमिती अध्यक्ष गणेश पेडणेकर, गजानन सातार्डेकर व सर्व वनसमिती सदस्य व गावातील ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रश्न मिटला आहे. मळगाव गावच्या हद्दीत नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी ३ लाखांपर्यंत निधी खर्च करून पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभिकरणाचे काम होणार आहे.

या पर्यटनस्थळामुळे सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील पर्यटनात वाढ होणार आहे. त्यादृष्टीने सावंतवाडी वनखात्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत मळगाव हद्दीत वनखात्याअंतर्गत चिटणीस बंधारा बांधण्यात आला आहे. यातून वनखातेही जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येते.


पालकमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक पर्यटनात्मक बदल होत आहेत. या विकासात्मक कामांची पूर्तता वेळीच होणे गरजेचे आहे. एखादे विकासात्मक काम निधीअभावी रखडता नये.

ठेकेदाराने आपले काम उत्कृष्ट दर्जाचे आणि वेळेत पूर्ण करावे. तरच तो उपक्रम यशस्वीरित्या मार्गी लागू शकतो, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे मळगाव धबधब्याचे काम वेळेत झाल्यास येत्या पावसाळ्यात हे नवीन पर्यटनस्थळ जिल्ह्यात नावारूपास येऊन व्यावसायिकांसह स्थानिकांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध होईल, यात शंका नाही.

सहकार्यातूनच विकास शक्य

कोणतेही विकासकाम असो, संबंधित खाते व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य असल्यास काम सहज शक्य होते. पालकमंत्री केसरकर, सावंतवाडी वनविभाग आणि मळगाव ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून नरेंद्र डोंगरातील धबधबा सुशोभिकरणाचा प्रश्न एक वर्षात सुटला आहे. त्यामुळे विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमात अन्य कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

 

पर्यटनातून बदल घडविणार
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. या जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे टप्प्याटप्प्याने विकसित करण्यासाठी प्रयत्न आहेत. पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. आंबोली येथे बटरफ्लाय गार्डनसह इतर पर्यटनात्मक उपक्रम हाती घेतले आहेत. याचा फायदा येथील लोकांना निश्चितच होणार आहे. जनतेने आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी, विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनातून बदल घडवून आणले जातील.
- दीपक केसरकर,
पालकमंत्री


ग्रामपंचायतींच्या प्रयत्नांना यश

मळगाव हद्दीत नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असणाºया धबधब्याचे सुशोभिकरण करणे यासाठी मळगाव ग्रामपंचायत आणि वनसमितीने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. यासाठी उपवनसंरक्षक, अधिकारी यांचे सहकार्य लाभले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्यामुळे धबधबा नव्या स्वरूपात साकारत आहे. यात मळगाव ग्रामपंचायत सदस्य व वनसमितीचेही प्रयत्न आहेत.
- गणेशप्रसाद पेडणेकर,
मळगाव ग्रामपंचायत वन समिती अध्यक्ष, सरपंच


काम लवकर पूर्ण करणार

धबधब्याच्या विकासामुळे पर्यटनात वाढ होणार आहे. याचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. या निसर्गरम्य जागेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे. पर्यटनात्मक बाबींना प्राधान्य देण्यासाठी वनखात्याचे प्रयत्न आहेत.
समाधान चव्हाण,
उपवनसंरक्षक, वनखाते सिंधुदुर्ग


सावंतवाडी-मळगाव घाटीतील धबधब्याचे पर्यटनात्मकदृष्ट्या नूतनीकरण व सुशोभिकरण होणार

Web Title: Another tourist attraction in Sawantwadi taluka has been received from Malgaon waterfowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.