शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

सिंधुदुर्ग : जल्लोष २0१८ चा शानदार शुभारंभ, देवगड तालुका पर्यटनदृष्ट्या भविष्यात अग्रेसर गणला जाईल : नीतेश राणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 6:46 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात मालवणचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र भविष्यात देवगड तालुका हा पर्यटनदृष्टया अग्रेसर व पुरोगामी तालुका म्हणून गणला जाईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले. देवगड येथे नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या जल्लोष २०१८ या कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवगड तालुका पर्यटनदृष्ट्या भविष्यात अग्रेसर गणला जाईल : नीतेश राणे देवगडमध्ये लवकरच स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू होणार दोन स्क्रिनचे चित्रपटगृहदेखील सुरू होणार

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात मालवणचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र भविष्यात देवगड तालुका हा पर्यटनदृष्टया अग्रेसर व पुरोगामी तालुका म्हणून गणला जाईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले. देवगड येथे नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या जल्लोष २०१८ या कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, देवगड तालुक्याची ओळख ही तीन वर्षांपूर्वी मागास तालुका म्हणून होती. मात्र तो पुरोगामी आणि विकासासाठी अग्रेसर ठरावा म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. देवगडमध्ये लवकरच स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू होणार असून दोन स्क्रिनचे चित्रपटगृहदेखील आपण सुरू करणार आहोत.

येथे वॅक्स म्युझियम सुरू झाल्याने देवगडमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने वाढ होत आहे. यापूर्वी विकासासाठी अथवा प्रकल्पासाठी विरोधाचे पत्र देण्याची पद्धत देवगड तालुक्यात होती. मात्र देवगड तालुक्याची मानसिकता अशाच जल्लोषसारख्या कार्यक्रमाने बदलेल असा आशावादही आमदार राणे यांनी व्यक्त केला.

देवगड तालुका सर्वांगाने अग्रेसर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु. देवगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत संघर्ष करीत असतो. इतर तालुक्यांना मिळणारा निधी आपल्या देवगड तालुक्यालाही मिळायला हवा यासाठी मी सतत प्रयत्न करीत असतो. यामुळे भविष्यात हा तालुका जिल्ह्यात अग्रेसरच असेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.यावेळी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, कोकण माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, अ‍ॅड. अविनाश माणगावकर, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ, प्रकाश राणे, एकनाथ तेली, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, संदीप साटम, व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफशेठ मेमन, शामराव पाटील व सर्व व्यापारी बांधव यावेळी उपस्थित होते. देवगड-जामसंडे नगर पंचायतीच्यावतीने देवगड येथे उपक्रमांची माहिती देणाऱ्या स्टॉलचे उद्घाटनही आमदार नीतेश राणे यांनी फित कापून केले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग