शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ग्रामसेवकपदी पदोन्नती, चिंतेने ग्रामपंचायतीच्या शिपायाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 16:32 IST

ग्रामसेवक म्हणून पदोन्नती झाल्याच्या चिंतेने कलबिस्त येथील ग्रामपंचायतीच्या सदानंद शांताराम जाधव (वय ४०) शिपायाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देग्रामसेवकपदी पदोन्नतीचिंतेने ग्रामपंचायतीच्या शिपायाची आत्महत्या

सावंतवाडी : ग्रामसेवक म्हणून पदोन्नती झाल्याच्या चिंतेने कलबिस्त येथील ग्रामपंचायतीच्या सदानंद शांताराम जाधव (वय ४०) शिपायाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. रात्री घरातील अन्य सदस्य दुसर्‍या खोलीत झोपल्याचे  पाहून रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने हा प्रकार केला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. सावंतवाडी कलबिस्त ता. सावंतवाडी येथील ग्रामपंचायतीत गेले चौदा ते पंधरा वर्षे सदानंद हा काम करीत होता. दरम्यान त्याला चार दिवसापुर्वी तुमचे ग्रामसेवक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यामुळे तुम्हाला तो कार्यभार स्विकारावा लागेल, असे पत्र जिल्हा प्रशासनाकडुन प्राप्त झाले. पदोन्नती मिळाली तरी अन्य ठिकाणी बदली होणार, आपल्याला ते जमणार नाही. त्यामुळे आपल्याला टेंशन आले आहे, असे त्याने अनेकांना सांगितले होते.हे पत्र आल्यापासुन तो चिंतेत होता. काल रात्री ग्रामपंचायतीतले काम आटपून घरी गेल्यानंतर तो नेहमीप्रमाणे कुटूंबाशी बोलला आणि रात्री उशिरा अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने घरात असलेल्या बाजूच्या खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. सकाळी हा प्रकार त्याच्या आईवडीलांचा लक्षात आला. आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच त्यांच्यासह पत्नी व मुलांनी हंबरडा फोडला. सदानंद हा गेली चौदाहून अधिक वर्षे ग्रामपंचायतीत काम करीत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे अनेकांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. येथील कुटीर रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्‍चात आईवडील, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. याबाबतची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य रवी मडगावकर, सरपंच शरद नाईक, पोलिस पाटील गणू राउळ आदींनी येथील कुटीर रुग्णालयात धाव घेत मदतकार्यात सहकार्य केले.पदोन्नतीच्या भितीने आत्महत्यायाबाबतची माहिती पंचायत समिती सभापती रवी मडगावकर यांनी दिली. त्याची पदोन्नती १७ तारखेला होती. आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सुचना त्याला मिळाल्या होत्या; मात्र त्या दिवसापासून तो चिंतेत होता; प्रमोशन मिळाले तरी अन्य ठिकाणी बदली होणार, आपल्याला ते जमणार नाही. त्यामुळे आपल्याला टेंशन आले आहे, असे त्याने अनेकांना सांगितले होते. या चिंतेमुळे त्याने हा प्रकार केला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाPoliceपोलिस