खासगी शाळेवरील शिक्षकांना ज्येष्ठतेनुसार मिळणार पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 04:13 PM2018-03-20T16:13:09+5:302018-03-20T16:13:09+5:30

 मालेगाव - खासगी अनुदानित शाळातील डीएड पदवीधर शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविल्यानंतरही पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. आता अशा पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रकरणी शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे.

Promotions for private school teachers as per their seniority | खासगी शाळेवरील शिक्षकांना ज्येष्ठतेनुसार मिळणार पदोन्नती

खासगी शाळेवरील शिक्षकांना ज्येष्ठतेनुसार मिळणार पदोन्नती

Next
ठळक मुद्देअटींमुळे पदवीधर डीएड  शिक्षकांनी आवश्यक पात्रता  मिळविल्यानंतरही त्यांना पदोन्नती पासून दूर रहावे लागत होते. पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्टता सूची बाबत स्पष्टीकरणात्मक आदेश शिक्षण विभागाने काढला आहे.शिक्षकांची जेष्ठता कोणत्या तारखेपासून करावी याच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत.

 मालेगाव - खासगी अनुदानित शाळातील डीएड पदवीधर शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविल्यानंतरही पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. आता अशा पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रकरणी शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. त्यानुसार  डीएड पदवीधर शिक्षकांना न्याय मिळणार आहे.

डीएड पात्रता धारण करणाº्या शिक्षकांना उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदावर पदोन्नती देताना किचकट प्रक्रिया होती. महाराष्ट्र राज्य खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली १९८१ अनुसूची नियम १२ एफ मधील तरतुदीनुसार प्रवर्ग मध्ये अंतर्भाव होण्यासाठी सदर प्रवर्गातील विहित केलेल्या अर्हता धारण करणे आवश्यक होते. या प्रवर्गातील संदिग्ध शैक्षणिक पात्रतेच्या अटींमुळे पदवीधर डीएड  शिक्षकांनी आवश्यक पात्रता  मिळविल्यानंतरही त्यांना पदोन्नती पासून दूर रहावे लागत होते. त्यामुळे यात बदल करण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु होते. बीएड पात्रता प्रथम धारण करणाºयांना पदोन्नतीत प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे सेवाश्रेष्ठ असलेल्या पदवीधर डीएड शिक्षकांना सेवाज्येष्ठता व पदोन्नती नाकारली जात होती. या संदर्भात विविध संघटनांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्टता सूची बाबत स्पष्टीकरणात्मक आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. पदवीधर शिक्षकांची जेष्ठता यादी मध्ये शिक्षकांची जेष्ठता कोणत्या तारखेपासून करावी याच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत. त्यानुसार या निकषांवर या शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत जुन्या पद्धतीने पदोन्नती दिल्या. मात्र आता या परिपत्रकाने काही बाबींसंदर्भात संभ्रम असल्याचा सूर काही शिक्षकांमधून उमटत आहे. 


परिपत्रकानुसार झालेले बदल
 सामाईक ज्येष्ठता सूची ही पदोन्नतीच्या प्रयोजनार्थ विचारात घेण्यात यावी. पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित शिक्षकाचा पदवीधर शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश होईल. सदर यादीतील त्यांची ज्येष्ठता तारीख ही अखंड सेवेतील शिक्षक पदावर प्रथम नियुक्तीची तारीख राहील. शिक्षक संवर्गात प्रथम नियुक्ती तारीख व अखंड सेवा विचारात घेऊन तयार करण्यात आलेली सामाईक ज्येष्ठ सुची पद्धतीकरिता विचारात घेण्यात यावी व पद्धतीच्या पदाकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक व व्यावसायिक  अहर्ता अनुभवाच्या अटीसह पदोन्नतीच्या वेळेस संबंधित शिक्षक धारण करीत असेल तर पदोन्नतीसाठी संबंधिताचा विचार करावा. पदोन्नतीकरिता विचारात घ्यावयाची सामाईक ज्येष्ठता सूची ही उच्च प्राथमिक स्तरावर वर्ग सहावी ते बारावीच्या स्तरांकरीताही विचारात घेण्यात यावी.

Web Title: Promotions for private school teachers as per their seniority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.