शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सिंधुदुर्ग :  कोकण विभाग पदवीधर : आयुक्तांकडून निवडणूकपूर्व आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:44 PM

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार २५ जून रोजी मतदान होणार असून, गुरुवार २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्देकोकण विभाग पदवीधर : आयुक्तांकडून निवडणूकपूर्व आढावाकोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

सिंधुदुर्ग : मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार २५ जून रोजी मतदान होणार असून, गुरुवार २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

या अनुषंगाने कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूकपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक, दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव उपस्थित होते.निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष द्यावे, असे निर्देश डॉ. पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेऊन सूचना दिल्या.

निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक विषयक विविध परवाने घेण्यासाठी अनेक ठिकाणी जावे लागते, हे टाळण्यासाठी व उमेदवारांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करावी असे सांगितले.

या बैठकीला जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे (मुंबई शहर), सचिन कुर्वे (मुंबई उपनगर) डॉ. महेंद्र कल्याणकर (ठाणे), प्रदीप पी. (रत्नागिरी), दिलीप पांढरपट्टे (सिंधुदुर्ग) तसेच रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, सामान्य प्रशासन उपआयुक्त महेंद्र वारभुवन, महसूलचे सिध्दराम सालीमठ, करमणूकचे शिवाजी कादबाने, पुरवठाचे दिलीप गुट्टे, ह्यरोहयोह्णचे अशोक पाटील, पुनर्वसनचे अरुण अभंग तसेच जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.मुंबई पदवीधरमुंबई पदवीधर मतदारसंघात मुंबई उपनगर ५२,२८३, मुंबई शहर १८,३५३ असे एकूण ७०,६३६ मतदार आहेत. हे उमेदवार कोणाला पसंती देणार हे पाहायचे आहे.मुंबई शिक्षक मतदारसंघमुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये मुंबई उपनगर ८,२५२, मुंबई शहर १,८८९ असे एकूण १०,१४१ मतदार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी आगरी-कोळी भवन, सेक्टर - २४, नेरुळ, नवी मुंबई येथे होणार आहे.कोकण विभाग पदवीधर मतदारसंघपालघर १६,९८२, ठाणे ४५,८३४, रायगड १९,९१८, रत्नागिरी १६,२२२, सिंधुदुर्ग ५,३०८ असे एकूण १,०४,२६४ मतदार आहेत. 

टॅग्स :konkanकोकणElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी