शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सिंधुदुर्ग :  वाळूअभावी शासनाची बांधकामे ठप्प : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:48 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या घरांच्या बांधकामाबरोबरच शासनाची अनेक बांधकामे वाळूअभावी पूर्णपणे ठप्प झाली असून वाळूचे दर वाढण्यामागे सर्वस्वी जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व शासन हे सर्वजण असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले.

ठळक मुद्देवाळूअभावी शासनाची बांधकामे ठप्प : परशुराम उपरकरवाळूचे दरही वाढले; पालकमंत्र्यांवर विकासकामांबाबत टीकास्त्र

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या घरांच्या बांधकामाबरोबरच शासनाची अनेक बांधकामे वाळूअभावी पूर्णपणे ठप्प झाली असून वाळूचे दर वाढण्यामागे सर्वस्वी जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व शासन हे सर्वजण असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले. कोट्यावधीची कामे आणली अशा घोषणा करणाऱ्या पालकमंत्र्यांनी विकास कामांची बांधकामे कुठे सुरू आहेत ती दाखवावी, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

कुडाळ एमआयडीसीच्या विश्रामगृहावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाळा पावसकर, कुणाल किनळेकर, निलेश नेरकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.उपरकर यांनी सांगितले की, या जिल्ह्यात सुरुवातीला वाळू अल्पदरात म्हणजेच सात हजार रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र आजच्या स्थितीला या वाळूचा दर सुमारे १५ ते २० हजार रुपये झाला आहे. त्यामुळे ही वाळू घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही.

सर्वसामान्यांच्या घरांची बांधकामे ठप्प झाली आहेत. तर दुसरीकडे शासनाला या वाळूचा दर परवडत नसल्याने त्यांचीही बांधकामे ठप्प झाली आहेत. वाळूच्या या वाढत्या दरामागे पालकमंत्री दीपक केसरकर येथील लोकप्रतिनिधी व शासन हेच पूर्णपणे जबाबदार आहेत व त्यांच्या आडमुठे धोरणामुळे हे वाळूचे दर वाढत आहेत, असेही उपरकर यांनी सांगितले.

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर