शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:08 IST

कोकणातील शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 70 टक्के आरक्षण द्यावे, असा आग्रह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्री तावडे यांची मंत्रालयात काल मंगळवारी भेट घेऊन निवेदन दिले.

ठळक मुद्देकोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण द्याआमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांचा शिक्षणमंत्र्यांकडे आग्रह

सिंधुदुर्गनगरी : कोकणातील शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 70 टक्के आरक्षण द्यावे, असा आग्रह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्री तावडे यांची मंत्रालयात काल मंगळवारी भेट घेऊन निवेदन दिले.

शिक्षकांच्या भरतीत 2010 पूर्वी स्थानिकांना आरक्षण होते. त्यामुळे स्थानिक तरुण-तरुणींना नोकरी मिळत असे. विशेषतः ते जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असल्यामुळे परजिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्न करीत नसत. त्यामुळे कोकणातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या पुरेशी होती. मात्र, 2010 मध्ये राज्यस्तरीय शिक्षक भरती झाल्यामुळे कोकणात परजिल्ह्यातील शिक्षकांची नियुक्ती झाली.

परंतु, त्यांना मूळ जिल्ह्यात जाण्याचे वेध लागले असून, दरवर्षी 500 ते 600 शिक्षकांची बदली होत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी डावखरे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील डीएड-बीएड धारक तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून परजिल्ह्यातील शिक्षक उमेदवारांना रुजू होऊ न देण्याचा इशाराही संघटनांकडून दिला जात आहे, याकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.

कोकणातील बेरोजगार शिक्षकांना नोकरी मिळण्याबरोबरच शाळांमध्ये पुरेसे शिक्षक राहण्यासाठी स्थानिकांना नोकरीत 70 टक्के आरक्षण देण्याची गरज आहे, असे आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेTeacherशिक्षकsindhudurgसिंधुदुर्गMLAआमदार