सिंधुदुर्ग : पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 14:39 IST2018-09-21T14:38:16+5:302018-09-21T14:39:18+5:30
मागील दहा-बारा दिवस पावसाने उघडीप दिल्याने मळेवाडमधून वाहणाऱ्या नदीतील पाण्याची पातळी घटली आहे. या नदीती ल पाण्यावरच मळेवाड परिसरातील उन्हाळी शेती, बागायती अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, पावसाने हजेरी लावल्याने यापुढे समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्ग : पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी
सिंधुदुर्ग : मागील दहा-बारा दिवस पावसाने उघडीप दिल्याने मळेवाडमधून वाहणाऱ्या नदीतील पाण्याची पातळी घटली आहे. या नदीतील पाण्यावरच मळेवाड परिसरातील उन्हाळी शेती, बागायती अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, पावसाने हजेरी लावल्याने यापुढे समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
यावर्षी सुरूवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने नदीतील पाण्याची पातळी आतापर्यंत चांगली होती. मात्र मागली दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत खूपच घट झाली आहे. नदीच्या दुतर्फा असलेली माड बागायती तसेच उन्हाळी शेती नदीच्या पाण्यावर अवलंबून असते.
पावसाळी शेतीच्या तुलनेत गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी पिके घेण्याकडे मळेवाड परिसरातील शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसनू येते. यामध्ये नाचणी, भुईमूग, मिर्ची आदी पिकांसह विविध भाज्यांचाही समावेश आहे. नदीतील पाण्याची पातळी घटल्यामुळे वर्षभरासाठी पाण्याचा पुरवठा होईल की नाही या संभ्रमात शेतकरी वर्ग आहे.