सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सौरभ कुमार अग्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 23:07 IST2022-10-21T23:07:17+5:302022-10-21T23:07:32+5:30

सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी आले.

Sindhudurg District Superintendent of Police Saurabh Kumar Agarwal | सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सौरभ कुमार अग्रवाल

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सौरभ कुमार अग्रवाल

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी आले. शुक्रवारी याबद्दल स्थगिती येते न येते तोच सायंकाळी पुन्हा दाभाडे यांच्या जागी अहमदनगरचे अप्पर पोलीस  अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची बढतीपर नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.

गुरुवारी झालेल्या आदेशामध्ये औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक म्हणून बढती देण्यात आली होती. तर श्री. दाभाडे यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण जाहीर केलेले नव्हते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी श्री. दाभाडे हेच पुढील आदेश होईपर्यंत सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक राहतील असे स्पष्ट करण्यात आले. तर सायंकाळी प्राप्त आदेशानुसार सौरभ कुमार अग्रवाल यांना सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. दरम्यान श्री दाभाडे यांना अद्याप नवीन जागी नियुक्ती देण्यात आलेली नाही.

Web Title: Sindhudurg District Superintendent of Police Saurabh Kumar Agarwal