शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय आता सर्वसामान्यांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 17:45 IST

hospital Sindhudurg- कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अधिग्रहित केलेले जिल्हा रुग्णालय आता पूर्वीप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी खुले झाले आहे. आता येथे नॉन-कोविड रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्दे श्रीमंत चव्हाण यांची माहिती नॉन-कोविड रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया सुरू

सिंधुदुर्गनगरी : कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अधिग्रहित केलेले जिल्हा रुग्णालय आता पूर्वीप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी खुले झाले आहे. आता येथे नॉन-कोविड रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोना सेवेसाठी अधिग्रहित केले होते. त्यामुळे येथे अपघात उपचाराव्यतिरिक्त अन्य सेवा देण्यात येत नव्हती. शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्या होत्या. परिणामी जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होत होती.आता जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. येथे आता उपचार व शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पूर्वीप्रमाणे जिल्हा रुग्णालयात सर्व सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. सिटी स्कॅन, डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तींवर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.केवळ शासकीय शुल्क स्वीकारले जाणारशासकीय शुल्काशिवाय अन्य शुल्क घेतल्यास संपर्क साधा. जिल्हा रुग्णालयात आता शासकीय शुल्काशिवाय अन्य शुल्क घेतले जाणार नाही. तसेच औषधे बाहेरून घेण्यास सांगितले जाणार नाही. तसा प्रकार घडल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे. त्रुटी, अडचणी असल्यास कळवा. जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सुरू केले आहे. तरीही यात कोणत्या त्रुटी असल्यास किंवा सेवा मिळताना अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे. तसेच जनतेने शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य