शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: भुईबावडा घाटात दरड कोसळली, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 21:27 IST

Sindhudurg: मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याच्या काम जेसीबीच्या साहाय्याने सुरु केले आहे.

सिंधुदुर्ग - मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याच्या काम जेसीबीच्या साहाय्याने सुरु केले आहे.

तालुक्यात मागील काही दिवस पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून सह्याद्री पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गगनबावडा परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गगनबावड्यातून दीड किलोमीटर अंतरावर भुईबावडा घाटात दरड कोसळली.

दगड मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याने १०० ते १५० फूट लांब रस्ता व्यापला आहे. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे भुईबावडा घाट रस्त्यात असलेल्या अनेक वाहनांना माघारी परतावे लागले. घाट रस्त्यातून वाहने मागे घेताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली.वाहनधारकांचे हालसार्वजनिक बांधकाम विभागाला दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरूवात केली आहे. दरड हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असले तरी दरड हटविण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. भुईबावडा घाट रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्यामुळे वाहनचालक पुन्हा अडचणीत आले आहेत. सध्या करुळ घाटमार्गे अवजड वाहने वगळून वाहतुक सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतुक फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग