शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

सिंधुदुर्ग : रांगोळीतून स्वच्छतेच्या सप्तपदीचे आवाहन, शिल्पा खोत यांची शक्कल : मालवण शहरात होतेय उपक्रमाचे कौतुक; नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:37 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात भाग घेतला आहे. शहरातील प्रभागात स्वच्छतेबाबत अनेक कल्पना मांडून नगरसेवक यतीन खोत व त्यांच्या पत्नी शिल्पा खोत यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे ध्येय मनाशी बाळगले आहे.

ठळक मुद्देरांगोळीतून स्वच्छतेच्या सप्तपदीचे आवाहन शिल्पा खोत यांची शक्कल मालवण शहरात होतेय उपक्रमाचे कौतुकनागरिकांचा प्रतिसाद

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात भाग घेतला आहे. शहरातील प्रभागात स्वच्छतेबाबत अनेक कल्पना मांडून नगरसेवक यतीन खोत व त्यांच्या पत्नी शिल्पा खोत यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे ध्येय मनाशी बाळगले आहे.

शिल्पा खोत यांनी अनोखी शक्कल लढवित शहरातील सार्वजनिक कचराकुंड्यांच्या ठिकाणी स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या सुबक रांगोळी रेखाटून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या स्वच्छतेची सप्तपदी या उपक्रमाचे शहरात कौतुक होत असून नागरिकही कचरा अन्यत्र फेकून न देता कचराकुंड्यांत टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.मालवण शहरातील एसटी बसस्थानक ते भरड हा भाग प्रभाग तीनमध्ये येतो. नगरसेवक यतीन खोत यांनी प्रभागातील स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यात पालिका प्रशासन केंद्रशासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्याने नगरसेवकांकडून कंबर कसली जात आहे.

स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यातही प्रभाग तीनचे वर्चस्व राहिल्याने पालिकेच्यावतीने खोत यांचा सन्मान करण्यात आला. भरड सिताई संकुल येथे असलेल्या पालिकेच्या कचराकुंडीत नागरिक विविध प्रकारचा कचरा बेशिस्तपणे फेकून देत होते. त्यामुळे कचऱ्यांचे वर्गीकरण करताना अडचणी येत होत्या. याशिवाय उघड्यावर कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरायची. ही बाब लक्षात घेता नगरसेवक यतीन खोत यांच्या पत्नी शिल्पा खोत यांनी स्वच्छता जनजागृतीसाठी पुढाकार घेतला.

शिल्पा खोत यांनी अनोखी शक्कल लढवित सुरू केलेल्या स्वच्छतेची सप्तपदी या उपक्रमाचे शहरवासीयांनी कौतुक केले. पहिल्या दिवशी नागरिकांनी कचराकुंडीच्या ठिकाणी रेखाटलेली सुबक रांगोळी पाहून विविध प्रकारचा कचरा हा कचराकुंडीत टाकणे पसंत केले.

खोत यांनी रांगोळीच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर केल्यास परिसर स्वच्छ राहून दुर्गंधीही पसरणार नाही, असे खोत यांनी सांगताना प्रभागात नागरिकांच्या आवाहनाकरिता रांगोळी रेखाटून जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एक कदम स्वच्छता की ओरचा संदेशकचराकुंड्यांचा परिसर स्वच्छ करून शिल्पा खोत यांनी प्रभागातील महिलांच्या साथीने अभिनव उपक्रम हाती घेतला. स्वच्छ परिसरात सुशिक्षित नागरिक कचरा फेकून न देता तो कचराकुंडीत टाकतील या हेतूने शिल्पा खोत यांनी महिलांना सोबत घेऊन कचराकुंड्यांच्या ठिकाणी आकर्षक रांगोळी काढून स्वच्छतेचा संदेश दिला.

एक कदम स्वच्छता की ओर असा संदेश देत नागरिकांनी सहकार्य करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून तो कचराकुंडीत टाकावा, असे आवाहन केले. यावेळी माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेवक यतीन खोत प्राजक्ता गांगनाईक, हिमानी गायकवाड, प्रणाली गायकवाड, शांती तोंडवळकर, काजल खानोलकर, अनुराधा पांगम, बाबू हडकर, राजा वस्त, गणेश किडये, पालिकेचे सुधाकर पाटकर आदी नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान