Before the implementation of the Cleanup Marshal program, the Thane Municipal Council | क्लिनअप मार्शल उपक्रम राबविण्याआधी ठाण्यात कचराकुंड्या बसवा - मनसेचे पालिकेला निवेदन

ठळक मुद्देआधी सक्षम सुविधा द्या मग दंड आकारा - मनसे कचराकुंड्या बसवल्या नाहीत तर मनसे स्वखर्चाने शहरात कुंड्या बसवेल - अविनाश जाधवठाणेकरांकडून दंडाची अपेक्षा महापालिका कशी शकते - मनसे

ठाणे: ठाणे शहरात क्लिनअप मार्शल उपक्रम राबविण्याआधी रस्त्यांवर थोड्या थोड्या अंतरावर कचºयांचे डबे ठेवण्यात यावे. तसेच, क्लिनअप मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंड वसूल करण्याआधी त्यांना सक्षम पायाभूत सुविधा पुरवा अशा मागणीचे निवेदन मनसेने आज महापालिकेला दिले.
           शहर अस्वच्छ करणाºयांवर अंकुश बसावा यासाठी शहरभर ठाणे महापालिकेच्या वतीने तैनात करणाºया क्लीनअप मार्शलला मनसेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने नागरिकांना साध्या मुलभूत सुविधा देखील दिल्या नाहीत, अनेक सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडी नाही. त्यामुळे ठाणेकरांकडून दंड वसूल करणे ही महापालिकेची भूमिका योग्य नाही, आधी पायाभूत सुविधा द्या अशी मागणी मनसेने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दिले आहे. यावेळी मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, ठाणे शहर उपाध्यक्ष रविंद्र मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेने एक हजार कुंड्या बसवण्याचे आश्वासन दिले असून जर या कचराकुंड्या बसवण्यात आल्या नाहीत तर मनसे स्वखर्चाने शहरात कुंड्या बसवेल असे जाधव यांनी सांगितले. उघडयÞावर शौचास बसणे, कचरा टाकणे, रस्त्यात थुंकणे असे शहर अस्वच्छ करणाºयांवर तब्बल २४५ क्लीन अप मार्शल वॉच ठेवणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३० मार्शल दाखल झाले असून त्यांना महापालिकेने महत्वाच्या परिसरात तैनात केले आहे. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याचे सार्वजनिक स्तरावर कोणत्याही प्रकारचे प्रयत्न महापालिकेने केले नाहीत अशी परिस्थितीत ठाणेकरांकडून दंडाची अपेक्षा महापालिका कशी शकते असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.