शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : महामार्गाच्या चौपदरीकरणात १०० जणांचा अपघाती मृत्यु : उपरकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:18 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम होताना १६०० कोटी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र या कोटयावधी रुपयाच्या निधीत १ रुपयाचा फायदा स्थानिक बेरोजगार तरुणांना किंवा व्यापाऱ्यांना, क्रशरधारकांना झालेला नाही. आतापर्यंत महामार्गाच्या कामादरम्यान सिंधुदुर्गात १०० जणांचा अपघाती मृत्यु, ५०० जण जखमी तर अनेक गाडयांचे नुकसान झाले आहे. असा आरोप मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहामार्गाच्या चौपदरीकरणात १०० जणांचा अपघाती मृत्यु :उपरकर यांचा आरोपस्थानिकाना कुठलाही रोजगार नाही ; ठेकेदाराकडुन मुजोरी कायम

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम होताना १६०० कोटी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र या कोटयावधी रुपयाच्या निधीत १ रुपयाचा फायदा स्थानिक बेरोजगार तरुणांना किंवा व्यापाऱ्यांना, क्रशरधारकांना झालेला नाही. आतापर्यंत महामार्गाच्या कामादरम्यान सिंधुदुर्गात १०० जणांचा अपघाती मृत्यु, ५०० जण जखमी तर अनेक गाडयांचे नुकसान झाले आहे. असा आरोप मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात  ते बोलत होते.परशुराम उपरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्गातील एकाही तरुणाला महामार्गाचे काम घेतलेल्या संबंधीत दोन्ही ठेकेदार कंपन्यानी नोकरीला ठेवलेले नाही. आपल्या प्लान्टवर सुरक्षा रक्षक, लिपिक, शिपाई व अन्य विविध पदांवर परप्रांतीय कामगारांना ठेवण्यात आले आहे. धान्यपुरवठा करणारा ठेकेदारही परप्रांतीयच निवडण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गाच्या विकासात स्थानिकांच्या हाती काहीच लागलेले नाही.पर्यावरणाच्या मुद्यावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत पर्यावरण प्रेमींनी महामार्ग चौपदरिकरण कामात बाधित होणारे वृक्ष स्थलांतरित करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव शासनाने विचारात घेतला नाही.

भविष्यात महामार्गावरील झाडे तोडण्यात आल्याने मोठया प्रमाणात कॉक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. त्याचा त्रास जिल्ह्यातील जनतेला सहन करावा लागणार आहे. ठेकेदार कंपनीने आपल्या यंत्र सामुग्री तसेच मालमत्तेचा विमा उतरविला आहे. मात्र या कामा दरम्यान अपघात झाल्यास संबधित व्यक्तिस मदत होण्याच्या दृष्टिने अद्याप विमा उतरविण्याचे सौजन्य दाखविलेले नाही.चौपदरीकरणाच्या मुद्यावर दोन्ही सत्ताधारी पक्ष बोलताना दिसत नाही. विकास होताना प्रकल्पग्रस्तांची झालेली वाताहात विचारात घेतली पाहीजे. रस्त्याचा विकास करत असताना अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. याचा विचार व्यायला हवा. जनतेची दिशाभुल करण्यापलीकडे सत्ताधारी काहीही काम करत नाहीत.

कणकवलीतील काही नगरसेवकांनी उप अभियंत्याना निवेदन देवुन लक्ष वेधले आहे. मात्र त्यांनी सत्ताधारी म्हणुन मंत्र्याकडे मागण्याकरुन जनतेला दिलासा देण्याची गरज होती.मात्र तसे झालेले नाही. असेही उपरकर यावेळी म्हणाले.ठेकेदारच श्रीमंत होणार !केंद्र आणि राज्य शासनाचे एकच धोरण दिसुन येत आहे. ते म्हणजे श्रीमंताला अधिक श्रीमंत करणे. त्यामुळे ठेकेदारच या महामार्गाच्या चौपदरिकरण कामामुळे श्रीमंत होणार आहे. असेही उपरकर यावेळी म्हणाले.झाडाना जीवदान देणे आवश्यक !महामार्गाच्या कामादरम्यान हजारो झाडे तोडण्यात आली. त्यापैकी काही झाडे स्थलांतरीत करुन त्या झाडांना जीवदान देण्याची गरज होती. मात्र तसे न करता संबंधीत ठेकेदाराने व शासनाने पर्यावरणाचा विचार बाजुला सारुन चौपदरीकरणाचे काम केले आहे. हे योग्य नव्हे.

शहरातील वटवृक्ष वाचविण्यासाठी आपण सर्व प्राधिकरणाना पत्र दिले आहे. तसेच आवाज फाऊंडेशन सारख्या सामाजिक संस्थाशीही बोललो आहे. त्यांनी वृक्ष वाचविण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. शासनाने आता पुढाकार घ्यावा,असेही उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग