सिंधुदुर्ग : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण ठार, अचानक ब्रेक लागल्यामुळे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:32 IST2018-02-05T19:30:58+5:302018-02-05T19:32:49+5:30

पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश आरेकर (४५, रा. घोगळेवाडी, खानोली) या तरूणाचा जागीच ठार झाला.

Sindhudurg: Accident due to accidental collapse of youth, young killed and accidental breaks | सिंधुदुर्ग : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण ठार, अचानक ब्रेक लागल्यामुळे अपघात

सिंधुदुर्ग : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण ठार, अचानक ब्रेक लागल्यामुळे अपघात

ठळक मुद्दे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण ठारअचानक ब्रेक लागल्यामुळे अपघात

कुडाळ : पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश आरेकर (४५, रा. घोगळेवाडी, खानोली) या तरूणाचा जागीच ठार झाला.

मंगेश आरेकर हा कुडाळहून खानोली येथे आपल्या घरी जात होता. पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे त्याची दुचाकी घसरून तो दुचाकीसह रस्त्यावर आदळला. यात त्याच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच ठार झाला.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मंगेशच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

अचानक ब्रेक लागल्यामुळे अपघात

दुचाकीचा अचानक ब्रेक लागल्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरली. त्यामुळे मंगेशचे डोके रस्त्याच्या बाजूपट्टीवर आदळून तो गंभीर जखमी झाला, अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली.

Web Title: Sindhudurg: Accident due to accidental collapse of youth, young killed and accidental breaks