शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मूक जिद्दीच्या कलेला सुगंधी उटण्याचा दरवळ !

By admin | Updated: October 10, 2014 23:02 IST

बाहेर प्रचाराचे फटाके फुटताहेत. पण, ‘त्यांच्या’ विश्वात सुरू आहे ती दिवाळीची लगबग.

रत्नागिरी : बाहेर प्रचाराचे फटाके फुटताहेत. पण, ‘त्यांच्या’ विश्वात सुरू आहे ती दिवाळीची लगबग. कारण त्यांच्या उत्साहाचा सण अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलाय. कुणाला बोलता येत नाही, तर कुणाला ऐकू येत नाही, तरीही साऱ्यांचा उत्साह एकच, साऱ्यांची आकांक्षा एकच. दिवाळीत स्वयंस्फूर्तीने आपली कला सादर करून शाळेसाठी काहीतरी करण्याची. ही लगबग सुरू आहे, रत्नागिरीतील कै. केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात!विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत दिवाळी खरेदीची चर्चा बाहेरच्या जगात थोडी मागे पडली आहे. पण, ‘त्यांच्या’ विश्वात दिवाळीची लगबग आतापासूनच सुरू झालेय. जमेल ते योगदान दिवाळीच्या काळात शाळेसाठी द्यायचं आणि आपली कलाही सादर करायची, या दुहेरी हेतूनं ही चिमुकली मंडळी झटतायत.खरंतर कुणाला बोलता येत नाही तर कुणाला ऐकू येत नाही. पण, तरीही ही मुलं एकोप्याने दिवाळीच्या तयारीला लागली आहेत. कुणी ग्रिटिंग्ज तयार करतंय, कुणी पणत्या, कुणी आकाशकंदील तर कुणी किल्ला बनवण्यासाठी लागणारे सैनिक! कै. केशव परशुराम अभ्यंकर मूक बधिर विद्यालयातील मुला-मुलींनी तयार केलेल्या पणत्या पाहिल्या तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन झटक्यात बदलून टाकतील, एवढ्या मनमोहक आहेत. पणत्या तयार करताना लागणारे कष्ट आणि कलेचा लागणारा कस या दोन्ही कसोटीला तंतोतंत उतरून ही मुलं शाळेत रमली आहेत. काहीजणं अगदी उटणं तयार करण्याचं कामही करत आहेत. कुणाची कला ग्रिटिंग्जसाठीही बहरत आहे. विविध शुभेच्छांशी आणि वळणदार अक्षरांनी बहरलेली ही शुभेच्छापत्र अगदी कुणाच्याही भावनांना साद घालतील, अशीच आहेत. तसंच किल्ल्यावरील सैनिकही. विविध आकारांतील, विविध रंगाचे आणि विविध उंचीचे सैनिक बालगोपाळांच्या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी या शाळेत सज्ज झाले आहेत. त्याच्या जोडीला तुळशीवृंदावनही आहेत. एकूणच शाळेतील विद्यार्थी आता दिवाळीच्या स्वागताला जोमाने कामाला लागले आहेत. त्यांच्या कलेचा सुगंध बाजारपेठेतील उटण्यापेक्षाही जास्त दरवळत राहील, यात शंका नाही. (प्रतिनिधी)