Sindhudurg: सरमळेतील ऐतिहासिक मंदिर एका रात्रीत पूर्णत्वास, हर हर महादेवचा जयघोष 

By अनंत खं.जाधव | Published: March 6, 2024 03:51 PM2024-03-06T15:51:28+5:302024-03-06T15:52:40+5:30

पांडवकालीन इतिहासाची साक्ष देणारे श्री.सपतनाथ मंदिर एका रात्रीत पूर्ण

Shree Sapatnath Temple in Sarmale, which bears witness to the history of the Pandava period was completed in one night | Sindhudurg: सरमळेतील ऐतिहासिक मंदिर एका रात्रीत पूर्णत्वास, हर हर महादेवचा जयघोष 

Sindhudurg: सरमळेतील ऐतिहासिक मंदिर एका रात्रीत पूर्णत्वास, हर हर महादेवचा जयघोष 

सावंतवाडी : हर हर महादेवाचा गजर ब्रह्म वृदांच्या मंत्रोच्चार आणि हजारो भाविकांची उपस्थितीत बांदा दाणोली मार्गावरील सरमळे येथील पांडवकालीन इतिहासाची साक्ष देणारे श्री.सपतनाथ मंदिर एका रात्रीत पूर्ण करण्यात आले. यासाठी  11 राजस्थानी कारागीर वीस ते पंचवीस स्थानिक मदतनीस चार जेसीबी याच्या साह्याने हे मंदिर पूर्णत्वास नेण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.

बांदा दाणोली मार्गावरील सरमळे येथील पांडवकालीन श्री.सपतनाथ मंदिर एका रात्रीत बांधण्याचा निश्चय गोव्यातील एका उद्योजकांकडून करण्यात आला होता. त्याने आपले मत सरमळे वासियाकडे बोलून दाखवले होते. सरमळे वासियानी हे काम मनावर घेतले आणि देवाच्या सर्व रूढी परंपरा पूर्ण करून हे मंदिर एका रात्रीत बांधण्याचे निश्चित केले. त्यासाठी काल मंगळवार 5 मार्चला सूर्यास्तानंतर काम सुरू करायचे आणि आज बुधवारी 6 मार्चला सूर्योदयापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे ही निश्चित करण्यात आले.

त्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी उशिरा ब्रह्म वृदांच्या मंत्रोच्चारात आणि हजारो भाविकांच्या हर हर महादेवच्या जयघोषात करण्यात आला. मंदिराच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. या मंदिराला पांडवकालीन इतिहास लाभल्याच्या हे मंदिर एका रात्रीत पूर्णत्वास नेण्याचे आवाहन होते. मात्र हे आवाहन श्री.सपतनाथ देवाच्या साक्षीने सर्वानी लीलया पूर्ण करण्याचे ठरवले होते. त्यानुसार काम सुरू करण्यात आले.

या कामासाठी 11 राजस्थानी कारागीर दाखल झाले होते. त्याशिवाय स्थानिक मदतनीस असे 30 ते 35 जणांनी सूर्यास्तानंतर ब्रह्म वृदांच्या मंत्रोच्चारात आणि हजारो भाविकांच्या हर हर महादेवच्या जयघोषात कामाला सुरुवात केली. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी मंदिर साकारण्याचे सुवर्णक्षण यांची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

या धार्मिक सोहळ्यासाठी मंगळवारी सकाळी ग्रामदैवत सातेरी भगवतीची पालखी, तरंगे, निशाण काठी सवाद्य मिरवणुकीने चार दिवस या ठिकाणी वास्तव्यासाठी दाखल झाली आहेत. सपतनाथाचा इतिहास पांडवकालीन असल्यामुळे हे मंदिर एका रात्रीत साकारण्यासाठी क्षणाचीही विश्रांती न घेता हे मंदिर कारागीर आणि स्थानिक मदतनीस यांनी सूर्योदयापूर्वी पूर्णत्वास नेले. मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झाल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. यावेळी माजी आमदार शिवराम दळवी, अर्चना घारे-परब यांच्यासह अनेक नेतेही ठाण मांडून होते.

Web Title: Shree Sapatnath Temple in Sarmale, which bears witness to the history of the Pandava period was completed in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.