शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

शिवसेना घोषणा नाही तर अंमलबजावणीही करते : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 4:23 PM

सावंतवाडी : कोरोनाच्या संकटात दशावतारी कलाकारांच्या पाठीशी शिवसेना ठाम राहिली आहे. भविष्यात तुमच्याकडे अनेकजण येतील. आश्वासने देतील. पण घोषणा ...

ठळक मुद्दे सावंतवाडी परिसरातील ४० दशावतार नाट्यमंडळांना धनादेशांचे वाटप; आरपीडी हायस्कूलमधील कार्यक्रम

सावंतवाडी : कोरोनाच्या संकटात दशावतारी कलाकारांच्या पाठीशी शिवसेना ठाम राहिली आहे. भविष्यात तुमच्याकडे अनेकजण येतील. आश्वासने देतील. पण घोषणा करणाऱ्यांच्या पाठीशी रहायचे की अंमलबजावणी करणाऱ्यांच्या मागे रहायचे हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांंनी दशावतारी कलाकारांना केले.

पालकमंत्री सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सावंतवाडी परिसरातील ४० दशावतार मंडळांना धनादेशांचे वाटप केले. हा कार्यक्रम येथील आरपीडी हायस्कूलमध्ये पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, मतदारसंघप्रमुख विक्रांत सावंत, शहरप्रमुख नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अपर्णा कोठावळे, अशोक दळवी, राजन पोकळे, नारायण राणे, योगेश नाईक, सागर नाणोसकर, अमेय तेंडोलकर आदी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, हे कलाकार कोरोनाच्या काळात स्वत:ला सावरून पुढील काळात उत्स्फूर्तपणे कला सादर करतील अशी खात्री शिवसेनेला आहे. त्यामुळे कलाकारांना शिवसेना हात देत आहे. शिवसेना कायमच कलाकारांसोबत राहिली आहे. खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक या सर्वांनी ठरविल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून कलावंतांना मदतीचा विचार पुढे आला. शासनाची मदत कलाकरांना मिळेल पण या मदतीपेक्षा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आर्थिक संकटात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

ते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा एक असतानाचे आमचे गणेश मंडळ आहे. या गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी दशावतारी कलाकारांच्या मंडळांना मदत देण्यासाठी माझ्याकडे पाच लाख रुपयांची रक्कम दिली आहे. त्यातूनच मी दशावतारी नाट्यमंडळांना ही मदत वितरित करीत आहे.

दशावतारी कलाकारांच्या मदतीसाठी यापुढेही शिवसेना उभी राहील. आता कलाकारांनी या संकटानंतर पुन्हा उभे राहून उत्स्फूर्तपणे कला सादर करावी. शिवसेना तुमच्यासोबत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दशावतारी कलाकारांसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कॅश क्रेडीट देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा कलाकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सामंत यांनी केले.

यावेळी आमदार नाईक म्हणाले, दिवसा डोक्यावर बोजा आणि रात्रीचा राजा अशी अवस्था दशावतारी कलावंतांची असते. त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दशावतारी कलाकारांच्या पाठीशी कायमच शिवसेना उभी राहील, असे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ४० दशावतारी नाट्यमंडळांच्या अध्यक्षांना पाच लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, नारायण राणे, अपर्णा कोठावळे यांच्या हस्तेही धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी दशावतार मंडळाच्या कलाकारांचे स्वागत विक्रांत सावंत यांनी केले तर आभार रुपेश राऊळ यांनी मानले.

शिवसेना कायमच गरिबांच्या पाठीशीआमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला नगरपरिषद-नगरपंचायतींसाठी आमदार निधीतून अठरा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीदेखील झाली असल्याचे सामंत म्हणाले. शिवसेना कायमच गोरगरिबांच्या मदतीसाठी धावते. त्यामुळेच घोषणाबाजी करणाºयांसोबत की प्रामाणिकपणे मदत करणाºयांसोबत तुम्ही राहणार आहात ते तुम्हीच ठरवा, असे आवाहन कलाकारांना यावेळी त्यांनी केले. 

टॅग्स :konkanकोकणShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंत